पान:अभिव्यक्ती.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ / अभिव्यक्ती प्रीती बाजारी नसते तरी शेजारी असते खास ! " 'शेजारच्या प्रीतीने माझ्या डोळयातल्या अश्रूंची माळ गुंफली. ' आणि मग माझी आठवण 'हातांत हात घेऊन डोळे मिटले. बोलू पाहाणारे ओठ पुन्हा हालले नाहीत. ' महाराणी, सौंदर्यावर हक्क बजावणारा महाराजा, आंधळ्या निर्भय तरुणाला दिलेले प्रेमवरदान देवव्रत, नीलम आणि नीलमच्या प्रेमाची उतराई म्हणून स्वतःला खाईत झोकून देणारी त्याची ऋता. मृणालिनी, अशोक यांचे निस्सीम नैसर्गिक प्रेम. ' तो गेल्यावर गॅलरीत मी तशीच किती वेळ उभी राही. डोळ्यांना पाणी येई. as it ! या जगात कुणी कुणाचे नव्हे हे खरे ! , भोगविलासी हट्टी माणकावतीराणी आणि कला-समाधीत मग्न असलेला कैलासाचा निर्माता कलावंत ही विविध रंगांनी विनटलेली प्रणयाची चित्रे विविध रूपांत मूर्त झाली आहेत. मूलतः जीवन शोकात्म म्हणून या कथांतील शोकात्म प्रेमभाव अधिक प्रत्ययकारी बनला आहे. मानवी सूक्ष्म भावनांचा आविष्कार, मानसशास्त्रीय पातळीवर नेणारे मनो- विश्लेषण त्यांच्या कथांतून आढळते. मराठी कथेच्या विकासक्रमातील या कथांचा काळ लक्षात घेता या गोष्टीचे विशेष महत्त्व मानावे लागते. ' अंगणातला पोपट' या कथेत, 'आई अंतरली, बाप परका झाला, पोराने धास्ती खाल्ली म्हणून पोपटाचा दुःखंद करुण अंत घडला.' पोपटच्या मनाची कोवळिक, कदाचित पोपटच्याच उज्ज्वल भवितव्यासाठी पैसे जोडणान्या भाईच्या अखेरपर्यंत लक्षात आली नाही. क्षीण ग्लानी आलेल्या पोपटने आपल्या मित्रांना दिलेली हाक त्यांना कळू शकली नाही. पोपटचा पुन्हा स्वाभाविक गैरसमज झाला, ' मित्रही माझ्यावर रागावले सगळे सगळे रागावले ' सगळा खेळ आटोपल्यावर कथा संपते कुठे तर.... 'म्युनिसिपल शाळे- तील मुलांनी फाटकासमोर उभे राहून हाक दिली, " पोपट " हा प्रसंग मोठा मार्मिक आणि या संदर्भात लक्षणीय म्हणावा लागेल. शांताबाई संकष्ट चतुर्थीचा उपास कर- णार म्हटल्यानंतर कदाचित ' कणव ' आली असेल पण ' आजीबाई म्हणून मी तिला चिडविणार होतो, पण का न कळे, गप्प बसलो. ' इथेही किंवा निरुपद्रवी शांताबाई मोठा भाबडा प्रश्न विचारते, 'खरोखरच एखाद्याचा पायगुण वाईट असतो का हो ?' सासूबाईच्या नित्याच्या बोलण्यातून मनावर बिंबलेला भाव, या मनोवस्था ( states of mind ) किती समर्थपणे दिवाकरांनी रेखाटल्या आहेत. मृणालिनीचे लावण्य : ' भित्री मृणाल अंगणात हात धुण्यास जायला घाबरते ' आणि ' अंधारात काय क असेल याचा काय नेम ? भवितव्यता ही अंधारासारखीच नाही का ? ' किंवा ' तरुण पोरी खुट्ट झाले की रडायला लागतात ? ' इथेही हाच प्रत्यय येतो. दिवाकर कृष्णांच्या कथेची भाषा मोठी अभ्यसनीय आहे. कलात्मक संयम आणि सूचकता, आशयानुरूपता तीत प्रत्ययाला येते.