पान:अभिव्यक्ती.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ / अभिव्यक्ती आत पडद्यातल्या या गोष्टी कुणी वाचल्याचे मला समजले तर लज्जेने माझा जीव कासावीस होईल', (मृणालिनीचे लावण्य) दिवाकर कृष्णांच्या निवडक कथांच्या आधारे हे विचार मांडीत असताना मराठी कथेच्या प्रारंभकाळातच या वाङमय- प्रकारात त्यांनी भावमधुर चैतन्य निर्माण केले हे तीव्रतेने जाणवल्याशिवाय राहात नाही, ते पुरतेपणी पटतेच !