पान:अभिव्यक्ती.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कथाकार दिवाकर : निवडक विचार / ८१ या कथेतील देवव्रत आणि ऋता, एक पुरुष आणि स्त्री या नात्याने त्यांचे कथेत चित्रित केलेले अव्यंग प्रेम. विसाव्या शतकाच्या आरंभातील मराठी कथेचा प्रवाह आणि कालसंदर्भ लक्षात घेता लेखकाला दंडकारण्यातील वातावरणाचा आधार या अभिव्यक्तीसाठी घ्यावा लागला असे वाटते. माणसाच्या जीवनातील, मनातील चिरंतनाच्या शोधासाठी, संसूचनासाठी नेहमीच असा आधार कलावंत साहित्यिकांना घ्यावा लागणार आहे. मग हे वातावरण वास्तव, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक वा पौराणिक असेल. 'गोत्र जुळले नाही, जुळत नाही' ही देवव्रताने ऋतेला सांगितलेली सबब तत्कालाचा ठसा उमटलेली असली तरी मनुष्यस्वभाव दर्शनाचे तळ ऋतेच्या निखल संवेदनापूर्ण शुद्ध मनाच्या मागणीने हलल्याशिवाय राहात नाही. लावण्य आणि कारुण्य यांचे नाते अतिनिकटचे या लेखकाला उलगडलेले आहे. कथेतील पात्रांना ( आणि वाचकांनाही ) झपाटून टाकणाऱ्या लावण्याच्या कल्पनेची दिवाकर कृष्णांनी रेखाटलेली ही विविध चित्रे त्यांच्या कथांचे एक खास वैशिष्ट्य म्हणूनच निर्देशित करावे लागते. मृणालिनीचे, महाराणीचे, दंडकारण्या- तील प्रणयिनीचे, कैलासाचा निर्मातामधील माणकावतीराणीचे - प्रत्येकीचे लावण्य एक वेगळे वलय निर्माण करते, विलक्षण कुतूहल, आकर्षण निर्माण करते, दुःख पदरी बांधते. वरदानापेक्षा शापच ठरते. अगदी शांताबाई घेतल्या तरीसुद्धा हेच प्रत्ययाला येते. ‘शांताबाईंची यौवनवेल आता फुलली होती. तिची फुले मात्र अजून काही कारणांमुळे कारणी लागली नव्हती.' ही कमालीची सूचक भाषा कालसंदर्भात असली तरी आशय स्पष्ट आहे. अशोक अत्यंत अनीतीचा ठरून कवडीमोल अब्रूचा होऊन फरारी झाला, याला कारण अभागी मृणालिनीचे सौंदर्यच ! " , आपल्या कथेत प्रणयाची भावना रंगविताना ही प्रीती हक्कात -अधिकारात नाही तर मुक्त स्वातंत्र्यात निःसंकोच उमलते. त्याच्या विविध परी ' संकष्ट चतुर्थी', महाराणी', दंडकारण्यातील प्रणयिनी', 'मृणालिनीचे लावण्य', कैलासाचा या कथांतून व्यक्त झाल्या आहेत. संकष्ट चतुर्थीमधील 'शांता ' प्रेममूर्ती होती. निर्माता 'प्रीती मिळेल का हो बाजारी' 'प्रीती मिळेल का हो शेजारी ? ' हे गुणगुणणारा निवेदक मी ( भाऊजी) म्हणतो, “ मग कुठे ? प्रीती माझ्या हृदयात कुठेतरी आहे हे मला माहीत होते .. त्याचा कोणता भाग चिरून तिला कसा दाखवावयाचा हे मात्र माहीत नव्हते, " आणि शांताबाई उद्गारते, “भाऊजी, अ...६