पान:अभिव्यक्ती.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कथाकार दिवाकर : निवडक विचार सोळा बालकवी, मर्ढेकर, विश्राम बेडेकर या मोजक्याच सरस लिहिणाऱ्या साहित्यिकांच्या मालिकेत कथाकार दिवाकर कृष्णांचा समावेश करावा लागतो. कथालेखनाचा काळ, परिस्थितीचा संदर्भ आणि एका सर्जनशील प्रतिभावंताने कथानुभवाचे प्रगट केलेले घाट (forms) पाहाता कुणालाही तळमळीने लिहावेसे वाटेल असे या कथाकाराच्या कथांचे स्वरूप आहे. 'खरा कलावंत बोध आणि रंजनाच्या आवर्तात सापडत नाही' याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवाकर कृष्ण ! म्हणून त्यांच्या कथा अंतर्बाह्य आशय आणि • अभिव्यक्तीच्या दृष्टीने परंपरेतील कथेपेक्षा वेगळ्या ठरल्या. काव्यात्म भावोत्कटतेची पातळी त्यांच्या कथांना लाभते ती यामुळेच ! एक अप्रतिम मधुर लावण्याचा साक्षात्कार त्यांच्या कथेतून रसिकांना होतो. ' दंडकारण्यातील प्रणयिनी', 'मलयगिरीवरील वसंतकाल', 'महाराणी', 'कैलासाचा निर्माता' या स्थलकालदृष्ट्या दूरच्या रमणीय वातावरणात वाचकाला भारावून, दिपवून टाकणान्या उत्कट भावकथांचा आवर्जून विशेष विचार होणे . आवश्यक आहे असे वाटते. 'ययाती' सारख्या कादंबरीत वि. स. खांडेकरांच्या अजोड कल्पनाविलासाने बहरलेल्या वेलीचे पोषण-भरण कदाचित या कथांनी केले असले पाहिजे असा विचारही मनात येऊन जातो; तो निश्चितच अर्थपूर्ण म्हणावा लागतो. कथानकं, घटना, प्रसंग, व्यक्ती यांपेक्षा संवेदनरूप अनुभूतीवर, लेखकाच्या काव्यात्म मनः पिंडावर अधिक लक्ष दिवाकर कृष्णांनी केंद्रित केले आहे. त्यांच्या कथेचे हे वेगळेपण लक्षात घेऊनच त्यांचा विचार व्हायला पाहिजे असे वाटते. मानवी भाव-भावनांचा अविकृत प्रकृतीपर्यंत, संस्काररहित मूळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न दिवाकरांनी केलेला येथे दिसतो. उदाहरणार्थ, 'दंडकारण्यातील प्रणयिनी '