पान:अभिव्यक्ती.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी कथा : एक दृष्टिक्षेप / ७९ शेळके, मधू मंगेश कर्णिक, रा. रं. बोराडे, आनंद यादव यांचा नामनिर्देश करता येईल व आजचे नावारूपाला आलेले कथाकार म्हणून जी. ए. कुलकर्णी, अच्युत बर्वे, चि. त्र्यं. खानोलकर, वि. वा. शिरवाडकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, वि. शं. पारगावकर, वसुंधरा पटवर्धन, विद्याधर पुंडलिक, रणजित देसाई, दि. बा. मोकाशी इत्यादी अनेक कथाकारांचा उल्लेख करता येईल. - नवकथा स्वरूप : अपेक्षा कथावाङ्मयप्रकाराचा प्रारंभापासून आजच्या बदललेल्या स्वरूपाचा येथवर विचार केला. कादंबरी आणि कथा यांतील भेद ठळकपणे लक्षात घेतलाच पाहिजे. म्हणजे घटनांची उतरंड रचण्याचा वा व्यापक अनुभव संकुचितपणे व्यक्त करण्याचा मोह टाळता येईल. कथानुकूल अनुभवाचे स्वरूप कथाकारांनी नीट समजावून घेतले पाहिजे. म्हणजे कथा वा कादंबरी या दोन भिन्न वाङमयप्रकारात गल्लत होणार नाही. प्रचंड जीवनानुभव त्याच्या सर्व अंगोपांगासहित साकार करणे कथावाङ्मय- . प्रकाराला शक्य नाही. त्यासाठी कादंबरीकडे वळले पाहिजे. जीवनानुभूतीतील खंड, . -अनुभवसरितेतील काही बिंदू कथेतून टिपावयाचे असतात त्यादृष्टीने आजचे कथाकार यशस्वीपणे कथालेखन करीत आहेत असे म्हणता येईल. नवकवितेप्रमाणेच नवकथेच्या बाबतीतही कृत्रिम, वरवरचे अनुकरण करणारी प्रवृत्ती आढळते. तेव्हा अपेक्षा एवढीच की कथाकारांची अनुभूती अस्सल, रसरशीत, सखोल व प्रामाणिक असावी. त्यातून लेखक-वाचकाच्या वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. जीवनातील स्पंदनाला, विविध क्षणांना यशस्वीपणे शब्दबद्ध करण्याची तळमळ अनुभवाच्या सखोलतेसह असली म्हणजे आपोआपच कलात्मक सौंदर्याची वृद्धी होईल.