पान:अभिव्यक्ती.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ / अभिव्यक्ती सतत नव्या नव्या अनुभवांचा शोध घेणारे व अफाट अनुभवविश्व असलेले गंगाधर गाडगीळ मराठीतील प्रतिभासंपन्न कथाकार, नवकथेच्या क्षेत्रात त्यांचे स्थान व कार्य फार महत्त्वाचे आहे. १९४० सालचे भीषण जीवन-या जीवनातील • किडलेपण त्यांनी टिपले. आपल्या सर्वच कथांतून कठोर वास्तवाचे गांभीर्य त्यांनी सातत्याने टिकविलेले आढळते. मानवी मनाचा शोध घेत घेतच सामाजिक जाणिवाही त्यांनी साकार केल्या. जीवनातील मूलभूत समस्यांचे चित्रण ते करतात. यांत्रिकता च त्यातून नष्ट होणारे मानवी मन व्यथित अंतःकरणाने ते चित्रित करतात. या संदर्भात ‘किडलेली माणसं', 'बिन चेहऱ्याची संध्याकाळ', 'उन्हाळा', 'वारा भरलेली शीळ', 'तलावाचे चांदणे' इत्यादी अनेक कथा उल्लेखनीय आहेत. त्यांची प्रत्येक कथा चिंतन करायला भाग पाडते. गाडगीळांची कथा कुठल्याही स्थिर स्वरूपाच्या तत्त्वज्ञानाच्या धाग्याने आपल्या अनुभवविश्वाला बांधून घेत नाही . यातच त्यांच्या यशाचे रहस्य सामावलेले आहे असे म्हणता येईल. उलट अरविंद गोखले यांची कथा मानवी जीवनासंबंधीचे समीकरण मांडते. सांकेतिक तत्त्वज्ञानाचा अंगीकार ते करतात, यांत्रिक जीवनातून जन्माला आलेले दुःख गोखल्यांची कथा यशस्वीपणे रेखाटू शकते. मात्र जीवनासंबंधीच्या ठोकताळ्याने त्यांच्या कथानुभव कक्षा मर्यादित होतात. ' मंजुळा', 'चलन', 'रिक्ता', 'अनामिका' इत्यादी कथा निर्देशिता येतील. आपल्या सर्वच कथांना ते शेवटी कलाटणी मोठ्या मार्मिकतेने देतात. हा गोखल्यांचा. महनीय विशेष म्हणावा लागेल. “ रांगोळी मेहरप पूर्ण करणाऱ्या कुशल ललनेवत् गोखले कथावस्तूची उभारणी करतात " हेच खरे. अस्सल, वस्तुनिष्ठ, जातिवंत ग्रामीण कथा प्रथमतः मराठीत आणली ती व्यंकटेश माडगूळकरांनीच. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक वैचारिक जाणिवा (अट्टाहासाने) माडगूळ- कर व्यक्त करीत नाहीत. तर स्वतःच्या अनुभवविश्वाशी त्यात इमान राखलेले असते. दारिद्र्याशी झुंझणाऱ्या प्रभावी व्यक्तींत म्हणजे त्यांची 'माणदेशी माणसे' मराठीत अमर ठरतील यात शंका नाही. अतिशय प्रभावीपणे ते दुःख अभिव्यक्त करतात. त्यात कुठेही भावविवशता आढळत नाही. असे असूनही वाचकांच्या मनावरील व व्यक्ती- वरील त्यांची पकड कायम राहाते. व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेतील आणखी एक भाग जाणवतो तो म्हणजे त्यांच्या कथेत प्रदर्शनात्मक वृत्ती डोकावत आहे, अशी शं यायला लागते. ‘हे पाहा ! खरंखुरं ग्रामीण जीवन' अशा आभासाने ते लिहीत असतात. तर कधी कधी ते ग्रामीण वातावरणाची तपशीलवार चित्रे कथेतून देतात. मूळ अनुभवाशी संगत सुसंबद्ध असा तपशील द्यायला हरकत नाही; पण अनेकदा ते अप्रस्तुत व काहीसे अनावश्यक वाटू लागते. याखेरीज ग्रामीणकथालेखक म्हणून मान्यता पावलेले श्री. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, शंकरराव खरात, उद्धव