पान:अभिव्यक्ती.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

● नवकथा : आघाडीवरील कथालेखक मराठी कथा : एक दृष्टिक्षेप / ७७ यानंतर मानवी मनाच्या अगदी तळाशी जाऊन शोध घेणारी, त्याचबरोबर 'जीवनातल्या मूल्यविहीन अवस्थेचे चित्रण करणारी कथा लिहिली जाऊ लागली. मराठीतील श्रेष्ठ दर्जाच्या कथांची ही निर्मिती होती असे म्हणता येईल. याच वेळी मराठी नवकवितेच्या युगालाही सुरुवात झाली. नवकवितेच्या क्षेत्रातील चैतन्य व जिवंतपणा हाच मराठी कथेच्या प्रांतातही जाणविल्याखेरीज राहात नव्हता. ध्येय- वादाच्या पाठीशी लागून मानवी मन त्या विशिष्ट चौकटीत कोंबणे हा प्रकार श्री. पु. भा. भावे, गाडगीळांच्या नवकथेत एकदम थांबला आणि जीवन व माणसाचे मन या नाट्याला नवकथेत अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. माणसाच्या मनाचे विविध धागे, त्यांची उकल, त्यांचे बहुरंगी प्रवाह, त्यांना प्राप्त होणारा आकार, मनाच्या परिवर्तनातील लवचिकपणा ह्याला स्थान मिळाले. जीवनातील क्षण बारकाईने तपासले जाऊ लागले. मानवी मनाला या पूर्वीच्या कथेत ठोकळेबाज़ रूप प्राप्त झालेले होते. परंतु आता ते नाहीसे होऊन अनेकविध भावनांच्या संदर्भात मन शोधले. जाते. बदलते मन व त्याचे विविध प्रवाह चित्रित केले जातात. वस्तुतः यापूर्वीच ह्या चौकटी तोडण्याचा प्रयत्न झालेला होता, नाही असे नाही. पण त्यात यश लाभले ते मात्र गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर यांनाच. पु. भा. भाव्यांची कथा मूल्यविहीन क्षुद्र बनलेल्या मानवी मनाला, जीवनाला साकार करून पाहाते: • गाडगीळ व भावे यांच्यात वैचारिकदृष्ट्या महदंतर आहे, तथापिही दोहोंच्या जीवन- दर्शनात साम्य आढळते. आजची तरुण पिढी हवी तितकी प्रागतिक - पुरोगामी स्वरूपाची नसून, अस्सल, खरेखुरे जीवन तिला कळत नाही हा पु. भा. भाव्यांचा रोख आहे. एकूण नवकथेत विशिष्ट परिस्थितीतील मानवाचे सामान्यत्व, क्षुद्रत्वच या ना त्याप्रकारे व्यक्त होताना दिसते. भाव्यांचे वेगळेपण सांगायचे म्हणजे ते दिव्य पारंपरिक उदात्त कल्पनेने भारावलेले आहेत. म्हणूनच त्यांना आजचे जीवन नीरस वाटते. आपल्या जीवनविषयक दृष्टिकोनात भावे नियतीला महत्त्व देतात. नियतीसमोर मानवाचे सामान्यत्व ते चित्रित करतात. यातच त्यांच्या कथेच्या मर्यादाही स्पष्ट होतात. फॅसिस्ट ( fascist ) ची प्रवृत्ती सतत भाव्यांच्या कथेतून व्यक्त होताना आढळते. म्हणूनच त्यांची कथा सांकेतिक बनते. मात्र भावे जेव्हा जीवनाचा प्रत्यक्षपणे शोध घेतात तेव्हा त्यांची कथा कलापूर्ण बनते. मानवी जीवनातील विदारक सत्याचा . साक्षात्कार होऊन त्यांचे संवेदनशील मन आनंदून उठते. 'काळ, काम आणि वेग, ' वैरी, १७ वे वर्ष, स्वप्न, ध्यास इत्यादी कथा या संदर्भात उल्लेखिता येतील. मानवी : मन व कुजलेल्या संस्कृतीचे दर्शन घडविणान्या त्यांच्या सांकेतिक झालेल्या कथा वगळल्यास ते श्रेष्ठ कथाकार ठरतात. -