पान:अभिव्यक्ती.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी कथा : एक दृष्टिक्षेप / ७३ फोफावली. अगदी उघडपणे आपणास असे म्हणता येईल की, हरिभाऊंची कथा ही बोधवादी होती. त्यांचे सर्वच लिखाण बोधवादाच्या मूळ भूमिकेतूनच स्फुरलेले आहे. बोधवादी वाङ्मय म्हटले म्हणजे त्यात वास्तवाची, कठोर वस्तुस्थितीची बूज राखली जाईलच असे नाही. निदान त्यात प्रमाणशीरपणा आढळणार नाही. खरे म्हणजे हरिभाऊंच्या कथात्मक साहित्यात आढळणारे, ' पाल्हाळाचा आढळ आणि नीतिबोध' हे दोन्हीही घटक कलात्मकतेला उपकारक नाहीत. परंतु त्यांच्या कथेतील कथानकाच्या उत्कटतेमुळे हे दोष तेवढ्या तीव्र स्वरूपात जाणवत नाहीत. 'काळ तर मोठा कठीण आला' या त्यांच्या दीर्घ कथेचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. मध्यमवर्गीय समाजाचे सहानुभूतीपूर्ण निरीक्षण आणि समाजहिताबद्दलचा जातिवंत जिव्हाळा या त्यांच्या विशेषांमुळेच हरिभाऊंची कथा लोकप्रिय रंजक, उद्बोधक व तितकीच परिणामकारकही झालेली आहे. हरिभाऊंच्या बरोबरीनेच 'सहकारी कृष्ण' यांनीही मराठी कथेस वैशिष्टय प्राप्त करून दिले. 'घटनाप्रधानता' हा ह्या कालखंडातील कथेचा एक महत्त्वाचा विशेष होता. चमत्कृतिजन्य गुंतागुंतीच्या घटनांवर ही कथा केंद्रित झालेली होती. वाचकांच्या मनावर जास्तीत जास्त परिणाम कसा साधता येईल त्याचा विचार करूनच त्या दिशेने प्रयत्न केले जात होते. फारसा विचार न करता एका घटनेमागून दुसरी घटना नोंदविली जात होती. ' कादंबरी' या वाङ्मयप्रकाराच्या वेगळेपणाची यावेळी फारशी जाणीव नसल्यामुळे कथा म्हणजे ' संक्षिप्त कादंबरी' ( compressed novel ) .यासारखेच कथेचे स्वरूप मानले जाई. या कथांतून प्रामुख्याने त्यागाचेच चित्रण आढळते आणि शेवट ' आनंदीआनंदाने ' होताना दिसतो. कथाfवकासातील दुसरा टप्पा 'मासिक मनोरंजन ' कथाविकसनाच्या कार्यात मोलाची भर ' मासिक मनोरंजना' ने टाकली. त्यातून प्रसिद्ध होणाऱ्या कथा अधिकाधिक कलात्मक स्वरूपात अवतरत होत्या. मराठी 'स्त्री' कडे एका वेगळ्या दृष्टीने वेगळ्या भूमिकेतून पाहिले जाऊ लागले, त्यात एक प्रकारची जवळीक होती. 'स्त्रीविषयक आत्मीयता व सहानुभूती होती. सुसंगत कथावस्तू आणि व्यक्तीचे स्वभावरेखन, व्यक्तिदर्शन जास्तीत जास्त प्रभावी- पणे या कथा घडवीत होत्या.' पाल्हाळ आणि बोधवाद ( नीतिबोध), याला आपो- . आपच आळा बसत होता. किमानपक्षी तो भर ओसरलेला होता असे म्हणता येईल. हरिभाऊनंतरची कथा कोरड्या बोधवादामुळे नीरस, थिल्लर आणि भडक बनली होती. ( उदा :- नारायण हरि आपटे यांची कथा . ) यानंतर मुन्शी प्रेमचंद, शरच्चंद्र, रवींद्रनाथ टागोर यांसारख्या श्रेष्ठ कथा- कारांच्या कथात्मक साहित्याची वैपुल्याने भाषांतरे व रूपांतरे झाली. या काळा- तील विलक्षण लोकप्रियता मिळविलेले कथाकार म्हणजे वि. सी. गुर्जर. त्यांची कथा