पान:अभिव्यक्ती.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंधरा मराठी कथा : एक दृष्टिक्षेप प्रस्तुत लेखात मराठी कथासाहित्यावर दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहजिकच त्यामुळे मराठी कथाकार, या कथाकारांच्या कथा आणि त्यांच्या कंथालेखनातील विशेषांचा विस्तृत परामर्श घेतलेला नाही. तथापि मराठी कथा- वाङ्मयप्रकाराच्या विकासातील, वांटचालीतील महत्त्वाचे टप्पे, त्याचप्रमाणे कथा- क्षेत्राला नवीन वळण लावणारे कथाकार, त्यांचे कथावाङ्मय-विकसनातील कार्य . इत्यादी गोष्टींचा विचार केलेला आहे. मराठी गंद्यावताराबरोबरच कथा जन्मली मराठी गद्याचा अवतार होत असतानाच मराठी कथेची बीजेही आपणास पाहावयास मिळतात. विविध वाङ्मयप्रकारांच्या मूळ स्वरूपाकडे वा आरंभीच्या अवस्थेकडे पाहिले तर आपणास त्या या वाङ्मयप्रकारांतील कृती अनुवादित वा भाषांतरित असलेल्याच पाहावयास मिळतात. हीच गोष्ट मराठी कथेच्या संदर्भातही दिसून येते. हरिभाऊंच्या 'स्फुट गोष्टी' म्हणजे आजच्या कथेचे प्रारंभीचे स्वरूप हे जरी खरे असले तरी त्या पूर्वीही स. का. छत्रे यांचा ' बालमित्र' (१८३३) आणि कृष्ण-- शास्त्री चिपळूणकर यांच्या ' अरबी भाषेतीलं सुरस व चमत्कारिक गोष्टी ' (१८६१ ते १८६५) येथपासून प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे म्हणा अगर नेणिवेतून म्हणा पण खऱ्या अर्थाने लघुकथालेखनाला प्रारंभ झाला होता. पंचतंत्र, हितोपदेश, नीतिकथा, वेताळपंचविशी, बालकथा अशा अनेक लोककथा लिहिल्या गेल्या ज्यांचा समावेश आपणास कथात्मक साहित्यात करता येईल. या कथेने वाचकं स्वतःकडे आकर्षित करून घेतला. त्यात त्यांना रस वाटू लागला. १८८९ ते १९१५ कयाविकासातील पहिला टप्पा १८८९ मध्ये सुरू झालेल्या ' करमणुकी 'तून हरिभाऊंच्या ' स्फुट गोष्टी ' प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यातच मराठी कथेचे बीजारोपण झाले. कथा अंकुरली,