पान:अभिव्यक्ती.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभिव्यक्ती / ७४ बंगाली कथेच्या परिणामातून जन्मली. त्यांची प्रतिभा वंगीय वाङ्मयावर पोसली आणि त्या आधारे मराठी कथेस गुर्जरांनी वैशिष्ट्य प्राप्त करून दिले. " रंजकता, नर्म - विनोद, भाषेचे लालित्य, कथेमध्ये एखादे रहस्य ठेवून वाचकांची उत्कंठा वाढविण्याचे कौशल्य, सुशिक्षित पांढरपेशा वर्गात नुकत्याच प्रकट होऊ लागलेल्या कल्पनारम्य प्रणयभावनेचे खुसखुशीतपणे केलेले चित्रण " ही त्यांच्या कथालेखनाची वि. स. खांडेकरांनी सांगितलेली वैशिष्ट्ये आहेत. गुर्जरांचा लक्षात घेण्याजोगा विशेष म्हणजे प्रथमतः स्त्रीपुरुषांच्या प्रणयाची त्यांनी रेखाटलेली चिते. याशिवाय भाषा. नटविण्याची त्यांची प्रवृत्तीही प्रकर्षाने जाणवू लागते. यानंतरचे कथाकार ना. सी. फडके ! यांच्या कथेची वीजे गुर्जरांच्या कथेत आढळतात. त्यात सहज लक्षात येण्याजोगे साधर्म्य आहे. ना. ह. आपटे, कृ. के. गोखले, काशीबाई कानिटकर, गिरजा- बाई केळकर, वामनराव जोशी, आनंदीबाई यांचा ह्या कालखंडातील कथाकार म्हणून नामनिर्देश करता येईल. कथावाङ्मयातील नवे युग : ' प्रवर्तक दिवाकर कृष्ण' $ १९२५-२६ च्या सुमाराला मराठी कथात्मक वाङमयात एका नव्या युगाला सुरुवात झाली. या युगाचे उद्गाते आणि प्रवर्तक ठरतात दिवाकर कृष्ण ! याच सुमाराला ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांनी अधिक भरीव स्वरूपाची कामगिरी बजावली. दिवाकर कृष्णांच्या कथेने वाचकांस लघुकथेच्या अभिजात स्वरूपाचे दर्शन घडविले. पूर्वीच्या घटनाप्रधान असलेल्या कथेला व्यक्तिदर्शनाभिमुख बनविण्यात दिवाकर कृष्णांनी साहाय्य केले. याशिवाय स्वतःच्या अस्सल प्रतिभासामर्थ्याने 'रूपगर्विता ' बनविले. त्यामुळे व्यक्तिमनांकडे होणारे दुर्लक्ष दूर झाले. असहाय्य जीवांच्या भावमय जीवनातील हृदयस्पर्शी कारुण्य आपल्या हळुवार हातांनी अलगद टिपून दिवाकरांनी ते कथारूपाने साकार केले. 'समाधि आणि इतर गोष्टी' (१९२७), 'रूपगर्विता आणि सहा गोष्टी' (१९४९) यांत दिवाकरांच्या वाढत्या सामर्थ्याच्या खुणा ठळकपणे उमटलेल्या आहेत. त्यांच्या कथेतील पोपट, सीता, - मृणालिनी, लीला, गौरी, आत्माराम, शशी या निरपराध, निरुपद्रवी जीवांच्या कथा दिवाकरांनी अत्यंत सहृदयतेने रंगविल्या आहेत, फुलविल्या आहेत. या सर्वांची मनोवैशिष्ट्ये विशेष लक्षणीय आहेत. दिवाकरांवरं romanticism चा फार मोठा परिणाम होता. माणसांच्या मनातील सूक्ष्म भावबंध, शृंगारानुभव यशस्वीपणे आणि संपूर्णतः नव्याने चित्रित करतात. फडके, खांडेकरांच्यासारखी त्यांची कथा वास्तवाला डावलणारी, बिनबुडी नव्हती, तर ती romantic असूनही मानवी मनाचे सखोल दर्शन घडवीत होती. यावेळी मराठी कथेत प्रामुख्याने वातावरणनिर्मितीला महत्त्व दिले जाऊ लागले. वातावरणनिर्मितीकडे कथाकारांचा कल आढळला, त्याचे श्रेय दिवाकरांच्या कथांनाच द्यावे लागते. !