पान:अभिव्यक्ती.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्रौंचवध : एक मूल्यमापन / ७१ त्या व्यक्तींचा व्यासंग बहुश्रुतता दर्शविण्याचा खांडेकर प्रयत्न करतात. प्रसंगी स्वतःच्या कादंबऱ्यादेखील ते पात्रांना वाचावयास देतात. एकंदरीत या कादंबरीत बुद्धी व भावना यांनाच महत्त्व आहे. त्यासाठीच कादं- बन्यांतील व्यक्तींची योजना ! वस्तुतः खांडेकरांना दीन-दलितांच्या उद्धाराबद्दल मनोमय तळमळ, खरीखुरी कळकळ वाटत होती. स्वार्थत्याग, संपन्न ध्येयवादाचे त्यांना आकर्षण होते. मात्र त्यांची ही आकर्षणे कादंबरीतील अनुभवाचा अपरिहार्य घटक, अविभाज्य अंग म्हणून येत नाहीत. एका अर्थाने त्यांच्या कादंबरीचे 'बळ ' ठरणारा हा ध्येयवाद, समाजवाद हा तितकाच हळव्या, दुबळ्या आणि बिनबुडी विश्वाशी आपले नाते जोडू पाहातो. ' सामाजिक भावना ' हा विकासशील मानवी जीवनांचा आत्मा आहे. ही भावना नेहमी तीन प्रकारांनी व्यक्त होते. शब्दांनी, अश्रूंनी आणि कृतींनी. या तीन प्रकारांनीच दादासाहेव, सुलोचना व दिलीप आपल्या भावना व्यक्त करीत होते ! असा सुवर्णमध्य गाठण्याचा ते प्रयत्न करतात. यात त्यांनी कादंबरीचा नायक 'दिलीप ' याला तिसरा प्रकार म्हटले. या भावनेचे हे तिसरे स्वरूप मानवी प्रगतीला उपकारक होऊ शकते. या स्वरूपात ती तोंडाने वा डोळ्यांनी बोलत नाही तर... ती स्वतःचे रक्त शिपून इतरांचे जीवन फुलविते. याचेच खरेखुरे उदाहरण म्हणजे दिलीप ! भगवंतरावांचे चित्रण दिलीपच्या व्यक्तिमत्त्वाशी सम-समांतर अंतर वा पातळी राखूनच केलेले आहे. कारण त्यातून या दोन भिन्न भिन्न व्यक्तिमत्त्वांतील नफावत वाचकांच्या लक्षात येते. मानवी जीवनविषयक मुलभूत प्रश्न वा खरीखुरी समस्या- निर्मितीची अपेक्षा शेवटपर्यंत या कादंबरीत पोहोचत नाही. 'दिलीप' सभास्थानी नसून माझ्या घरी होता, एवढेदेखील सुलोचना आपल्या प्रियकरासाठी राजरोसपणे सांगू शकत नाही. उलट ती तर नुसती कादंबरी वाचून- देखील ढसढसा रडण्याइतपत हळवी आहे. सामाजिक कादंबरीतील व्यक्ती ह्या नेहमी खऱ्या अर्थाने प्रतिक रूप (symbolic) बनल्या पाहिजेत. याचा अर्थ त्या एकाच वेळी विशिष्ट समाजाच्या प्रतिनिधी असाव्यात आणि दुसरीकडे त्यांना स्वतःचे असे खास व्यक्तिमत्त्वही (personality) लाभलेले असावे. व्यक्ती म्हणून त्या सजीव झाल्या पाहिजेत. मग साहजिकच या व्यक्ती, व्यक्तीकडून कुटुंब आणि कुटुंबाच्या निमित्ताने तो संपूर्ण समाज त्याच्या वास्तवासह चित्रित व्हायला लागतो. सामाजिकता हा त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा अपरिहार्य भाग बनतो. ह्या सामाजिकतेची, वास्तव- वादाची जाणीव ' क्रौंचवध' मध्ये क्वचितच होते. 30. 30