पान:अभिव्यक्ती.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० / अभिव्यक्ती आणि भगवंतरावांनी स्वतःचे चरित्र बालपणापासूनचे सांगायला सुरुवात केलेली - त्यात पुन्हा अनेक सूक्ष्म तपशील सारे सारे येते. कमलच्या बाबतीत दादासाहेबांचा होणारा अपसमज, भगवंतराव राजे- साहेबांचीच गुलामगिरी का पत्करतात ? यासंबंधीचा उलगंडा या स्वचरित सांगण्यातून होतो. भगवंतरावही शेवटी निर्दोष ठरावेत म्हणून खांडेकरांनी हा खटाटोप केला. भगवंतरावांना घडविण्यात राजांनाच सारे श्रेय होते हे स्पष्ट केले. याशिवाय एक महत्त्वाची पद्धत खांडेकरांनी क्रौंचवधात वापरली. ती म्हणजे व्यक्तींच्या पूर्वायुष्यातील घटनांची माहिती, तपशील, त्याच व्यक्तींना होणाऱ्या घट- नांच्या स्मरणाद्वारे करून देणे, त्यांच्या या पद्धतीमुळे कथानकाच्या गतिमानतेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे जाणवते. कुठे कथानक गतिमान होतेय, प्रवाही होतेय असे जाणवते आणि लगेच ते मंदावते. कुणातरी व्यक्तीला आपल्या पूर्वायुष्यातील स्मृती आठवतात; त्याही थोडथोडक्या नव्हे तर सविस्तर ! पुन्हा एका प्रसंगातून दुसरी, या पद्धतीने स्मरणभक्ती वाढतच जाते. या कादंबरीत आपला प्रथम परिचय होतो विधुर दादासाहेब दातारांशी. एका सुप्रसिद्ध कॉलेजातील ते संस्कृतचे प्रोफेसर. आदर्श प्रोफेसरांची भवभूतीवर मोठीच भक्ती, त्यापेक्षाही ते आहेत कॉलेजचे आधारस्तंभ; प्रिन्सिपॉलांचा उजवा हात. मोठ्या आदराने हे प्रिन्सिपॉल त्यांना सर्वतन्हेची मोकळीक देतात... प्रिन्सिपॉलसाहेब पुढे म्हणाले ..‘भगवंतराव, तुम्ही बरे होईपर्यंत खुशाल रामगडला राहा. कॉलेजच्या कामाची उगीच काळजी करू नका. ' दादासाहेबांची सुलू म्हणजे जीवनसर्वस्वच; ते प्रेमळ मायाळू आहेत. विरंगुळा म्हणून सतार वाजवितात. त्यांना तथाकथित बुद्धिवादी म्हणता येईल. मात्र त्यांची जीवनदृष्टी कुठेही खन्या वा कणखर बुद्धिवादाने संस्कारित झालेली नाही. फार तर त्यांना बुद्धिजीवी म्हणणे अधिक रास्त होईल. अन्यथा या बुद्धिवादाची साक्ष त्यांच्या कृती-उक्तीतून पटणे कंठीणच! जी गोष्ट दादांची तीच या कादंबरीची नायिका सुलोचना हिचीही - आगळे, स्वतंत्र, कणखर हे व्यक्तिमत्त्व संपूर्ण कादंबरी वाचून कुठेही वाटत नाही. तिची जीवनदृष्टी ही दिलीपच्या सहवासातून, या प्रियकराच्या प्रेमातूनच सिद्ध झालेली आहे. तिचे व्यक्तिमत्त्व मात्र दिलीप, दादासाहेब व भगवंतराव या तीन व्यक्तींच्या कचाट्यात बंदिस्त झालेले आहे. सुलोचना ही एका विद्वान प्रोफेसरांची मुलगी. अर्थात तिच्यावरील संस्कारही तसेच शालेय व कॉलेजातील परीक्षांतून तिने घवघवीत यश मिळविलेले आहे. मात्र तिचे हे असामान्य यश परीक्षेपुरतेच मर्यादित राहाते. व्यवहारात याचा कुठेही प्रत्यय येत नाही. चार वर्षांच्या सहवासातही दिनूची ( तिच्या दिलीपची ) तिला पारख होत नाही. काही विशेषणांच्या आश्रयाने वाचलेल्या ग्रंथांचे संदर्भ देऊन