पान:अभिव्यक्ती.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्रौंचवध : एक मूल्यमापन / ६९ एकदा त्याला कंटाळून भगवंतराव थेट पुढच्या दारातून बाहेर पडतात. प्रो. दादासाहेब दाराआडून वैतागलेल्या भगवंतरावावर करडी नजर ठेवतात. कारण अपरात्री आपला ज़ांवई कुठं जाईल याची कल्पना त्यांना आहे. भगवंतराव आत्महत्येपासून वाचावे म्हणून लगेच त्यांच्यावर पहारा करणाऱ्या दादांना त्यांच्यापाठोपाठ जावे लागते.. दादासाहेब आपल्या मागोमाग आल्याची चाहूल लागून भगवंतराव विषय बदलतात. " हो ! काही केल्या झोप येईना. तेव्हा म्हटलं बाहेर गार वाऱ्यात जरा घटका- भर बसावं." काही काळ स्तब्धता. न राहवून भगवंतराव म्हणतात- " . 'एका गोष्टीबद्दल मला क्षमा मागायचीय तुमची आणि ती गोष्ट म्हणजे ते तुमच्या नावाचं दिनकरचं पत्र ! ते फोडून वाचलं होतं मी.” फॉरीन रिटर्नड्, एवढा सुशिक्षित डॉक्टर पण- दादासाहेबांचं खाजगी पत्र का वाचतो ? कसा वाचू शकला ? 'ते पत्न भगवंतराव चोरून वाचतात. म्हणूनच तर दिलीप वा दिनूसंबंधीचा त्यांच्या मनात झालेला गैरसमज दूर होऊ शकला. नेमके भगवंतरावांच्या हाती सुलोचनेने दिलीपला लिहिलेलं पत्र पडावे अशी ही युक्ती ( म्हणूनच ). दिलीप आपल्या आजारी आईच्या अंथरुणाजवळ ते विसरतो. त्याचवेळी भगवंतरावांना दिनूच्या आईला तपासण्याची लहर येते आणि पुढे ठरल्याप्रमाणे घडते. सुलोचनेला काही एक झाले नाही. तिची तब्येत ठणठणीत आहे. हे भगवंतराव स्वतः डॉक्टर नुसते नव्हे तर फॉरिन रिटर्नड् असल्यामुळे त्यांना ते चांगले ठाऊक होते, यात शंका नाही. आणि मग ' माझ्या छातीत कळा निघतात. पत्र पाहाताच Sarasata निघून ये.' असे सुलोचना दिलीपला लिहिते. यातला घोटाळा या संशयी नवन्याला अधिक तीव्रतेने जाणवतो. वस्तुतः सभेत होणाऱ्या गोळीबारातून आपल्या विवाहापूर्वीच्या प्रियकराला वाचविणे आपले कर्तव्य समजणाऱ्या एका पतिव्रतेने केलेली ही युक्ती असते. पण वाचकांचं कुतूहल टिकवावे म्हणून खांडेकर त्यांची उत्कंठा आधी वाढवितात व मग हळूच सांगून मोकळे होतात. तावातावाने स्वगृही आलेल्या भगवंतरावांना त्यांचा गैरसमज दृढ करील असेच दृश्य पाहावयास मिळते. त्याचेही कारण खांडेकर देतात. सुलूला वाटते, दिलीपचे मितच त्याला सभास्थानी नेण्यास आले आहेत. म्हणून ती आपले सोंग आणखी वाढ- विते. खरे म्हणजे दिलीपवरील उदात्त, खऱ्याखुऱ्या आणि आत्यंतिक प्रेमानेच ती हे सारे करीत असते. एवढ्यात खाड्कन दार उघडून भगवंतराव येतात अन् अनपेक्षित भगवंतराव ( आपले पती) आलेले पाहून सुलोचना भेदरून दिलीपच्या गळयाला मिठी -मारते. अशा या प्रसंगाची उपरती भगवंतरावांना होते. ' आणि आपण केलेल्या या चुकीची क्षमा दादांच्याजवळ मागताहेत अशा एका गोड गैरसमजाचे निराकरण या पत्रातून होते. दादा व डॉक्टर तळयाच्या काठी एका निवांत वेळी आलेले आहेत.