पान:अभिव्यक्ती.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ / अभिव्यक्ती आपल्या कादंबरीतील कथानकात राहून गेलेले कच्चे दुवे, विस्कळीत - असंगत भाग यांना जोडण्याचा किंवा सांधण्याचा केवळ दुबळा प्रयत्न इथे असतो; म्हणूनच प्रत्येक गोष्ट पुन्हा एकदा 'दिलीप' वा 'भगवंतराव' यांच्या मुखाने सांगितली जाते, वदवून घेतली जाते. दिलीपने प्रोफेसरांना लिहिलेले पत्नही एका अर्थाने क्रौंचवधाच्या कथानकाची उजळणीच होऊन बसते. खांडेकरांचा हा दिलीप एवढ यावर थांबत नाही तर तो दादासाहेबांना वेळो- वेळी सल्ला देतो, सूचना देतो, (आणि ते त्याचे गुरू असूनही) त्यांना मार्गदर्शन करतो. 'दादासाहेब, या दृष्टीने ते चित्र मुद्दाम पाहा तुम्ही. 66 "1 " 'दादासाहेब, सुलूची समजूत घाला. कादंबऱ्या वाचूनसुद्धा ती रडू लागते. एरव्ही उपहासाने बोलणाऱ्या दादांना गांधीवादाची ओळखदेखील याच पत्रातून पटते. त्यांचा शिष्य त्यांना ही नवीन दृष्टी प्राप्त करून देतो. त्यातच प्रोफेसर दांतारांचा दिलीपविषयी झालेला गैरसमज आपोआप दूर होतो आणि अपेक्षित आनंदी आनंदाच्या शेवटाला वाट मोकळी होते. हे ' परिणामकारक ' पत्र दिनूची इतिहासवजा . माहिती सांगते, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बालपण, त्यावेळी अनेक प्रतिकूल • परिस्थितीशी द्यावा लागलेला झगड़ा; घरी अठराविश्वे दारिद्र्य. बाप फौजदार पण व्यसनी, त्यामुळे आईला मारहाण करणारा, मग नायकाच्या बालमनावर होणारे आघात, त्याच्या कोवळ्या प्रतिक्रिया चित्रित व्हायला लागतात. साहजिकच त्याचे अभ्यासातील लक्ष उडते ( वस्तुत: हा नायक स्कॉलरच ! .. पण बिचारा परिस्थितीने वाहंवला ) पुढे दादांशी गाठ - त्यांच्या कृपेचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख करून आयुष्याला लागलेलं हे वळण. हे सगळे अतिशय सूक्ष्म तपशीलासह त्या पत्नात येते. त्यातच व्याख्यानबाजी, खांडेकरांना प्रिय असलेल्या साम्यवादावरील, गांधीवादावरील भाष्यही करण्यास अवसर मिळतो. कादंबरीतील पात्रांचाही मेळ जुळविला जातो. भगवंतराव शहाणे ( सुलूचे पती ) आणि जोशी हे दिलीपचे वर्गमित्र दाखविता आले. हे सगळे वाचकांची उत्कंठा वाढवू शकत नाहीत. 66 'दादासाहेब, तुम्हाला हे पत्र लिहावयाचे कारण- पत्र हे दोन हृदयांचं संभाषण असतं ! आणि ज्यांच्यापाशी माझे हृदय मला मनमोकळेपणाने उघडून दाखविता येईल अशी माणसे दोनच आहेत. एक सुलू नि दुसरे तुम्ही !" असेही समर्थन त्यात आहेच. दिलीपच्या या पत्राप्रमाणेच भगवंतराव शहाणे यांनी सांगितलेल्या हकीकतीची . ही गत होते. हे कादंबरीतील अनुभवात अपरिहार्य म्हणून बसत नाही. सुलोचनेच्या अभावी विरंगुळ्यासाठी म्हणून भगवंतराव आपल्या पूर्व जीवना- तील प्रेयसी 'कमल' हिला बोलावतात. त्यांचे तिच्याशी सतत खटके उडतात. असेच