पान:अभिव्यक्ती.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चौदा क्रौंचवध :

एक मूल्यमापन

१९४२ साली वि. स. खांडेकरांची ' क्रौंचवध ' ही कादंबरी प्रकाशित झाली. ही कादंबरी वाचून संपविल्यानंतर विशेषत्वाने जाणीव होत असेल तर ती या कादं- वरीच्या तंत्राची व रचनापद्धतीची ! आपल्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणेच खांडेकरांनी याही कादंबरीत क्लृप्ती योजलेली आहे. सुलोचना आपले जाडजूड हस्तलिखित ( किंवा सुलूची आत्मकहाणी ) प्रो. दादासाहेब दातारांच्या हातात जणू वाचकांना वाचून दाखविण्यासाठी देते. प्रस्तुत ठिकाणी ज्या एका विशिष्ट माध्यमाचा अवलंब 'खांडेकर करतात, त्याच्या मर्यादा, बंधने आणि फायदेही तुमच्यासमोर स्पष्ट होतात. ' सुलोचना ' ही जबाबदारी दादासाहेबांच्यावर सोपवून जी जाते ती कादंबरीच्या • अखेरीस पुन्हा प्रत्यक्ष भेटते. तिची ही आत्मकहाणी, त्यासाठी आत्मनिरीक्षण वा आत्मपरीक्षण करण्याचे ( तितक्याच तटस्थ वृत्तीने ) सामर्थ्य अपेक्षित असते. त्या दृष्टीने ही कहाणी कमकुवत वाटायला लागते. सुलोचनेला महत्त्वाचे वाटणारे प्रसंग, घटना ह्यांचाच केवळ समावेश त्यात होतो. . कादंबरी लेखनाच्या ज्या विविध पद्धती आहेत, त्यात प्रामुख्याने अनुलोम, आणि प्रतिलोम या दोहोंचा आपण उल्लेख करतो. या सर्वच पद्धतींचे मिश्रण भाऊसाहेब खांडेकर या कादंबरीतून करीत असल्याचे आढळून येते. अनेक माध्यमांनी, साधनांच्या आश्रयाने, त्यांच्या कादंबरीच्या कथानकाची वाटचाल होते. साहजिक या साऱ्या लेखनपद्धतीच्या गुणधर्माप्रमाणेच कादंबरीचे स्वरूप बनते. सुलोचनेची कहाणी सांगणारे हस्तलिखित, कादंबरीच्या शेवटी आलेले लांब- लचक दिलीपने दादासाहेब दातारांना लिहिलेले पत्र, विचारली नसताना भगवंत- रावांनी निवेदन केलेली स्वतःची इत्थंभूत हकीकत एवढ्या गोष्टींचा वरील संदर्भात नुसता उल्लेख पुरे होईल. .