पान:अभिव्यक्ती.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ / अभिव्यक्ती ""काही पाठ केली, संतांची उत्तरे, विश्वासे “आदरे करुनिया ” या संत तुकोबारायांच्या भूमिकेतूनच आपणही संतवाङ्मय' विश्वासे आदरे ' वाचले पाहिजे, हा ' विश्वास व आदर ' च आपले कल्याण करणारा आहे, असे पांगारकरांचे मत एका पत्नोत्तरातून प्रगट झालेले आहे. ' ७ खरोखरच या विश्वास आदराच्या बळावर पांगारकरांनी प्रसन्न मनाने व सदाफुली राहून परिश्रमपूर्वक संतसाहित्य अभ्यासले, म्हणून " कै. लक्ष्मणरावजी पांगारकर यांची कीर्ती संतचरित्रलेखक म्हणून महाराष्ट्रीय वाङ्मयात अमर अशी राहील.' महाराष्ट्रात संतवाङ्मयाकरिता व भागवतधर्माकरिता काया-वाचा-मनाने झटणाऱ्या या तळमळीच्या ध्येयनिष्ठ पदवीधराला जन्मशताब्दीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन: " ऐशा ' लक्ष्मण रामचंद्र ' कविची केंव्हा न हो विस्मृती ॥ 34 34 34 ७. जीवनतरंग वि. व्यं. कचोळे ( पृष्ठ ८६ ) ८. साहित्य गौरव : संपादित ग्रंथ. भागवतधर्मं (लेख) : मां. वा. दांडेकर ( पृष्ठ ३८१ )