पान:अभिव्यक्ती.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

66 कै. ल. रा. पांगारकर / ६५ आहे. सदोदित आनंदी वृत्ती ठेवून ईश्वरीवृत्तीची जोपासना करावी हे त्यांचे लेखना- मागील ध्येय होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, 'माझ्या ग्रंथांपैकी भक्तिमार्गप्रदीप, मोरोपंत, तुकाराम, ज्ञानेश्वर व एकनाथ यांची चरिते, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड व प्रस्तुत ग्रंथ ( चरित्रचंद्र ) या ग्रंथांचे तरी महाराष्ट्रास विस्मरण होऊ नये असे मला वाटते. ५” " वाङ्मयाच्या द्वारे धर्मकार्य करणे हीच राष्ट्रसेवा होय, असा माझा निर्धार झाला. .६" त्यांच्या या उद्गारावरून लेखनविषयकदृष्टीची खरी कल्पना येते. संत- चरित्रांकडे पांगारकर वळले ती ही बोधवादी दृष्टी पुढे ठेवूनच ! संतांनीच संतांची हृदये जाणून घ्यावी, या विचारानुसार ते स्वतःच संतसाहित्यिक असल्यामुळे मोठ्या सद्भाविकतेने संतचरित्र लेखनाकडे वळले. 'राष्ट्रातील थोर पुरुष म्हणजे मुख्यतः आमचे संतकवी होत' ही तर त्यांची श्रद्धा होती. पारमार्थिक बुद्धीच्या तळमळीने लेखन करणारे पांगारकरांचे मन साहजिकच संतजीवनकार्याचा वेध घेऊ लागले. एक वाङ्मयप्रकार म्हणून त्यांची ही चरित्रे कलात्मकतेच्या स्पर्शापासून अलिप्त असली तरी 'सत्संगात, संतांच्या ग्रंथात व चरित्रात आपण रंगावे व रंगवावे' ही त्यांची ठाम भूमिका सुस्पष्टपणे लक्षात येते. संत व त्यांच्या साहित्याबद्दल अनुदारपणाने बोललेले त्यांना चालत नसे. पांगार करांच्या अंतःकरणात भक्तीचा खराखुरा जिव्हाळा असल्यामुळे त्यांची ही भूमिका बनली होती. ही भूमिकाच विपुल वाङ्मयाच्या त्यांच्या निर्मितीला कारणीभूत ठरली. मात या भावडेपणामुळे इतिहाससंशोधकाच्या बुद्धीतील सावधपणा, अचूकपणा, विचिकित्सकपणा, तपशीलातील निर्दोषता यांची उणीव निश्चितच पांगारकरांच्या चंरित्नवाङमयात जाणवते. असे असूनही बुद्धीचे फार प्रस्थ माजविणे त्यांना कधीच 'फारसे पसंत नव्हते. " १९०० ते १९०८ या कालावधीत प्रबंधवजा ' मोरोपंतांचे चरित्र आणि काव्य- विवेचन ' हा सर्वमान्यता पावलेला चरित्रग्रंथ त्यांनी लिहिला. तर १९१० मध्ये एकनाथचरितं ' आणि १९१२ मध्ये ' ज्ञानेश्वरचरित्र' लिहिले. यापुढील आठ वर्षांच्या प्रयत्नातून त्यांचे विशेष गाजलेले 'तुकारामचरित्र ' साकारले. यानंतर १९२२ साली ‘मुक्तेश्वरचरित्र आणि काव्य-विवेचन' हा ग्रंथ पूर्ण केला. श्रीकृष्ण वं संत नामदेव चरित्रांचे यानंतरचे त्यांचे संकल्प असूनही त्यांच्या हातून ते पूर्ण होऊ शकले नाहीत. तथापि या वरील ग्रंथांवरून 'मुलायम, रसाळ वाणीच्या प्रकर्षाने श्रद्धाळू असलेल्या ' या संतचरित्रकाराची ओळख पटते. ५. चरित्रचंद्र : ल. रा. पांगारकर, प्रस्तावना. ( पृष्ठ २१ ) ६. चरित्रचंद्र : ल. रा. पांगारकर ( पृष्ठ २४६ ) अ...५