पान:अभिव्यक्ती.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कै. ल. रा. पांगारकर / ६३ बहुविध चळवळींच्यामुळे बी. ए. होण्यासाठी १८९९ साल उजाडावे लागले. बी. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर लगेच त्यांचा विवाह झाला. पांगारकरांनी आपल्या विद्यार्थीदशेतच प्रभावी व्याख्याने व कुशल लेखक म्हणून स्थान मिळविले होते. परंतु त्यांचे गुरू प्रो. जिनसीवाले यांना 'पदवी मिळवायचे सोडून तत्पूर्वीचे हे उद्योग' संत नव्हते. प्रो. जिनसीवाले यांच्याच केवळ कठोर मार्गदर्शनाने पांगारकरांना बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण होणे भाग पडले. पुढे अक्कलकोटच्या स्वामींचे श्रेष्ठ शिष्य श्री. सीताराममहाराज मंगळवेढेकर यांचा अनुग्रह पांगारकरांना लाभला. जून १९०० पासून त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करून अध्यापनकार्याला सुरुवात केली. पंढरपूर, पुणे, २ उमरावती इत्यादी ठिकाणी १९०६ पर्यंत शिक्षकाचे काम करून यापुढे फक्त देवाचीच - एका ईश्वराचीच काय ती नोकरी करावयाची असे निश्चित ठरवून १९०७ च्या फेब्रुवारीत 'मुमुक्षु ' या नियतकालिकाला प्रारंभ - केला. मुमुक्षुने महाराष्ट्रभर त्यांना सुविख्यात केले. याचवेळी प्रवचनकार, वक्ते व लेखक-ग्रंथकार म्हणून महाराष्ट्रात त्यांचे नाव गाजू लागले. सोमवार दि. १० नोव्हेंबर, १९४१ रोजी हृदयविकाराने ह. भ. प. पांगारकरांचे वर्धा येथे दुःखद निधन झाले. आपल्या एकूण सत्तर वर्षांच्या हयातीत पांगारकरांचे ग्रंथकर्तृत्व, अध्यात्म- परमार्थाचा ध्यास व भागवतधर्माचे कार्य पाहाता शिवाय ते एक त्यावेळचे पदवीधर असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष वेधते. पांगारकरांची ग्रंथसंपदा पांगारकरांनी वैपुल्याने ग्रंथलेखन केले आहे. किंबहुना लेखन-वाचन-प्रवचन- व्याख्यान-कीर्तन यांसाठी पदवीधर असूनही नोकरी सोडून आपली संपूर्ण हयात त्यांनी वेचली. प्रबळ आत्मविश्वासाच्या बलावर केवढा धोका त्यांनी पत्करला होता याचे आज आश्चर्य वाटते. ' असा लेखनाच्या आधारावर उभा राहाणारा बी. ए. पदवीधर मी झालो' याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत असल्यास, म्हणूनच नवल नाही. त्यांनी शेकडो व्याख्याने देऊन श्रोतृवृंदाला मंत्रमुग्ध केले पण या केवळ व्याख्यारांपेक्षा अधिक काही केले पाहिजे या भावनेने, केवळ अध्यात्माला वाहिलेले 'मुमुक्षु' -१९०७ साली काढले आणि त्यांच्या लेखनव्यासंगाला अधिक गती मिळाली. तथापि परमार्थ - विषयाला वाहिलेले एक नियतकालिक संतत पावशतक चालविणे ही त्यांची मोठी 'महनीय व लक्षणीय कामगिरी म्हटली पाहिजे. २. पुणे येथील भावेस्कूल (१९०४ ) -३. उमरावती येथील राष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक (१९०५ )