पान:अभिव्यक्ती.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तेरा 66 ऐशा 'लक्ष्मण रामचंद्र ' कविची केव्हा न हो विस्मृती ॥” पांगारकरांचे जीवन कै. ह. भ. प. पांगारकरांचा जन्म आषाढ वद्य ११ शके १७९४ (दि. ३१ जुलै, १८७२) मध्ये पांगरी' या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजीपंत व आई नाव राधाबाई होते. कृष्णाजीपंत चिपळूणला मोजणीदार होते. त्यांचे बंधू श्री. रामचंद्रराव हे निपुत्रिक असल्याने त्यांनी ल. रा. पांगारकरांना दत्तक घेतले. येथून पुढे ते लक्ष्मण ' कृष्णाजी' ऐवजी लक्ष्मण ' रामचंद्र ' झाले. रामभाऊ अत्यंत धार्मिक, ईश्वरभक्त व सश्रद्ध होते. वयाच्या १४ व्या वर्षी आपले सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ल. रा. पांगारकर टिळक-आगरकर - चिपळूणकरांच्या 'न्यू इंग्लिश स्कूल ' मध्ये ( जून १८८६ ) पुण्यात दाखल झाले. या ठिकाणी त्यांना नामदार गोखले, लोकमान्य टिळक, वामनराव आपटे इत्यादी नामवंत आणि निष्ठावंतांचे सन्मार्गदर्शन लाभले. आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अत्यंत कष्टात आणि प्रतिकूल परिस्थितीत इ. स. १८९१ मध्ये पूर्ण करून तेवढ्यावरच समाधान न पावता आपल्या बोटातील तीन माशांची अंगठी व कानातली भिकबाळी गहाण ठेवून फक्त पंधरा रुपयांच्या भांडवलावर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणास पुण्यासारख्या ठिकाणी प्रारंभ केला. आज सर्वप्रकारे काल अनुकूल व सर्वत्र शिक्षणाची सोय उपलब्ध असूनही शिक्षणाबद्दल मात्र कमालीचे औदासीन्य व निरर्थकतेचा दृष्टिकोन आढळतो. या पार्श्वभूमीवर पांगारकरांची ही शिक्षणाची जिद्द केवळ अजोडच म्हणावी लागते. कॉलेजमध्ये असताना पुण्याच्या नगर वाचनालयाचा भरपूर उपयोग करून घेऊन पांगारकरांनी आपला व्यासंग परिश्रमपूर्वक वाढविला. अखिल भारतीय पातळीवर मान्यता पावलेल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या ह्या विद्यार्थ्याला १. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी हे गाव आहे