पान:अभिव्यक्ती.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पांगारकर सूक्तिसुमने / ६१ विचारकुसुमे संतवचनरूपी पुष्पवाटिकेतून निवडलेली असल्याने त्यांच्या लिखाणास अर्थात त्यांच्या लिखाणातून निवडलेल्या सूक्तीसही संतवाङ्मयाचा परिमळ सुटणे साहजिकच आहे. ८८ ' कोणचे तरी सुभाषित सतत गुणगुणत राहाणे हा कै. पांगारकरांचा प्रकृति- विशेष होता. घरात फिरताना अथवा घराबाहेर, काठी खांद्यावर टाकून ती दोन्ही हातांनी धरून, फिरताना ते नेहमी गुणगुणताना आढळून येत. त्यामुळे त्यांच्या लिखाणात गुणगुणण्याजोगी वचने पुष्कळच आढळून यावीत यात नवल नाही. तसेच भक्तिविषयाची जरी त्यांना आवड होती, तरी इतर प्रकारचेसुद्धा त्यांचे वाचन पुष्कळच होते. यामुळे त्यांच्या लिखाणात पुष्कळच विविधता . आढळून येते. " त्यांच्या लिखाणातून निवडलेल्या या सूक्तीवरूनही वर घडलेली गोष्ट स्पष्ट होणारी आहे. कै. पांगारकरांचे विविध विषयांवरील मतांचे हा ' सूक्तिसंग्रह ' हे उत्कृष्ट दर्शनच होय, असे म्हणावयास हरकत नाही. पांगारकरवाङमयाचा अभ्यास करणाऱ्यांची या योगाने उत्तम सोय झालेली आहे. तसेच कै. पांगारकरांनी वेळोवेळी केलेला उपदेश यात साठवलेला असल्याने या सूक्तीच्या मननाने आयताच - उत्कृष्ट शब्दांत सदुपदेश हृदयावर कोरला जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्र जनता घेईल असा भरंवसा आहे. " कै. प्राचार्य सोनोपंत दांडेकरांची ही प्रस्तावना असलेल्या 'पांगारकर सूक्ति- सुमने' या ग्रंथाबद्दलचा उल्लेख सुस्पष्टपणे 'श्री पांगारकर स्मारक ग्रंथ : भाग १. ला, साहित्य गौरव', संपादक : डॉ. य. खु. देशपांडे व ग. त्र्यं. बगदे ( १९४९ ) यांच्या या ग्रंथाच्या संपादकीय निवेदनात पृष्ठ १३ वर आलेला आहेच.. त्याचा हा अल्पसा परिचय. M M