पान:अभिव्यक्ती.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० / अभिव्यक्ती ( ३ ) हृद्गत : श्री. वि. व्यं. कचोळे ( ४ ) समर्पण (५) सूक्तिसुमने : संग्राहक : श्री. वि. व्यं. कचोळे ' ( ६ ) ह. भ. प. पांगारकरांचे ग्रंथकर्तृत्व : दे. भ. पां. श्री. आपटे ( ७ ) आधारभूत ग्रंथांची यादी : 'पांगारकरांची सूक्तिसुमने ' ( ८ ) पुरस्कार : श्री केशवदत्त महाराज ( ९ ) अभिप्राय : लो. बापूजी अणे, ना. ग. वा. मावळणकर, डॉ. य. खु. देशपांडे इत्यादी (१०) विषयवार सूची : या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. यावरून या ग्रंथाची स्थूल कल्पना निश्चितच येईल. प्रस्तावना माघ शु।। ११, शके १८६७, दि. १५ फेब्रुवारी १९४५ रोजी कै. सोनोपंत दांडेकर यांनी पुण्याहून लिहून पाठविली असल्याचा सुस्पष्ट उल्लेख आहे. प्राचार्य दांडेकरांसारख्या अधिकारी व्यक्तीची ही कै. पांगारकरांच्या ग्रंथाची प्रस्तावना विशेष लक्षणीय म्हणून जशीच्या तशी या हस्तलिखित परिचय लेखात पुढे देत आहे. प्रस्तावना : प्राचार्य मामासाहेब दांडेकर 'हरिभक्त परायण संतचरित्रकार कै. लक्ष्मणरावजी पांगारकर यांच्या रसाळ व भक्तिप्रेमाने ओथंबलेल्या व्याख्यान-प्रवचनाचा भक्तिप्रेमी महाराष्ट्रीय जनतेस इतक्यातच विसर पडणे शक्य नाही. त्यांचे शब्द अजूनही कित्येकांच्या कानांत गुणगुणत असतील; तरीसुद्धा काळाच्या ओघात विस्मृतीच्या पथावर जाऊ घातलेल्या त्यांच्या उक्तींतून निवड करून ती गुणगुणण्याची सोय झालेली पाहून कित्येक भक्तिप्रेमी महाराष्ट्रीयांस आनंद होऊन ते ही सोय करून देणारे श्री. कचोळे यांचे आभार मानतील यात शंका नाही. “ कै. पांगारकर हे संतवाङ्मयाचे गाढे उपासक म्हणून महाराष्ट्राच्या परि- चयाचे आहेत. त्यांचा उपजत ओढा भक्तिवाङमयाकडे होता. त्यांनी सन्तवाङम- याची ' मुमुक्षु ' च्या द्वारे संतांची वेगवेगळी रसाळ चरित्रे लिहून मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहून, तत्संबंधी व्याख्याने, प्रवचने करून हरएकप्रकारे दोन तपांवर सेवा केली. सुशिक्षितांमध्ये आपणाला श्री ज्ञानेश्वर, तुकारामांचा परिचय पांगार- 'करांच्या 'भक्तिमार्गप्रदीपा' मुळेच झाला असे सांगणारे किती तरी आढळून येतील. कै. पांगारकर हे स्वतः प्रेमळ व श्रद्धावान असल्यामुळे त्यांचे मुख्यत: वाचन धार्मिक वाङ्मयाचे असल्यामुळे त्यांचे लिखाण प्रेमळपणा व श्रद्धा यांनी भरलेले आहे. त्यांच्या लिखाणासंबंधी अर्थातच या सूक्तींसंबंधी असे म्हणता येईल की, त्यांची