पान:अभिव्यक्ती.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बारा पांगारकर सूक्तिसुमने श्री. पांगारकर - स्मारक - योजनेतील अद्याप अप्रकाशित राहिलेल्या एका हस्त- लिखिताचा परिचय प्रस्तुत लेखातून करून देत आहे. ' पांगारकर सूक्तिसुमने' या ग्रंथाच्या संदर्भातील दि. १ नोव्हेंबर, १९४७ रोजी दै. लोकसत्तेतून प्रसिद्ध झालेल्या वार्तेत म्हटले आहे की, " रविवार, कार्तिक व।। ६, शके १८६७ या कै. पांगारकरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रा. वि. व्यं. कचोळे यांनी कँ. पांगारकरांच्या समग्र ग्रंथामधून सुमारे ५२५ सूक्तिसुमने निवडून लिहून काढण्याचे काम पूर्ण केले. ' पांगारकरांच्या सूक्तिसुमनां ' चे पुस्तक ह. भ. प. प्रो. सोनोपंत दांडेकरांच्या प्रस्तावनेसह यथावकाश प्रसिद्ध होईल." यावरून १९४७ साली लिहून तयार असलेले प्रस्तुत हस्तलिखित गेली २५ वर्षे लेखकाच्या दप्तरी पडून आहे असे दिसते. या ग्रंथाचे स्वरूप संकलनात्मक असून लेखकाची भूमिका संग्राहकाची आहे. मात्र असे असूनही कै. सोनोपंत दांडेकरांची कै. पांगार- करांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारी व विशिष्ट दृष्टीने लिहिलेली छोटेखानी स्वरूपाची प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे. त्याचबरोबर दे. भ. पां. श्री. आपटेगुरुजी यांचा 'पांगारकरांचे ग्रंथकर्तृत्व' हा लेख यात संगृहीत केलेला असून या ग्रंथाला श्री. केशवदत्त महाराज यांचा पुरस्कार व लो. बापूजी अणे, दे. भ. दादासाहेब तथा ग. वा. मावळणकर, डॉ. य. खु. देशपांडे इत्यादींचे अभिप्राय लाभलेले आहेत. पांगारकरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य लक्षात घेऊन आज हे सर्व मोलाचे वाटत असल्याने त्याला प्रकाशात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. पांगारकरांची सूक्तिसुमने' या ग्रंथाच्या अंतरंगनिदर्शक अनुक्रमणिकेत ( १ ) मंगलाचरण ( २ ) प्रस्तावना : प्राचार्य ह. भ. प. सोनोपंत दांडेकर