पान:अभिव्यक्ती.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ / अभिव्यक्ती मोजून गाडीतून भरण्याचे काम वडिलांनी त्यांच्यावर सोपविले असता तीन रात्रंदिवस गाड्या भरभरून पाठविल्या तरीही भाताची रास पूर्वीइतकीच शिल्लक राहिली. आई-वडील वाराणशीला गेले असता घरी राहिलेले चांगदेव राऊळ एकाचवेळी घरी व वाराणशीतही आईवडिलांना आढळले. असे अलौकिक चमत्कार त्यांच्यातील परमेश्वर अवतारित्व सिद्ध करतात पत्नीच्या मातापितरांच्या श्राद्धदिनीसुद्धा 'रति- चिया चाडा' विनवणीने ते उद्विग्न झाले. तेव्हापासून ते संसार विन्मुख झाले. पुढे माहूरच्या यात्रेत श्री दत्तात्रेयाच्या व्याघ्ररूप भेटीत त्यांनी शक्ती स्वीकारली व ते ' द्वारावतीकार' झाले. अवधूत वेषाने राहून निर्विकल्प क्रीडा करू लागले. 'शूद्राच्या घरी आरोगण करीति : जैसीचि नगरामध्ये सकळ गृही क्रीडा करीति: तैसीचि अंत्यजांच्या घरी क्रीडा करीति ' यावरून आज आवर्जून मांडले जात असलेले पुरोगामी विचार त्या काळात चक्रपाणींनी प्रत्यक्ष आचरणात, स्वतःच्या कृतीत अवतरविले होते असे म्हणता येते याच ठिकाणी त्यांच्या व्यापक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. द्वारकेला चक्रपाणींनी अनेक जीवांचा उद्धार केला. त्यांचे हे ज्ञान संचाराचे कार्य चालू असताना दैववशात वऱ्हाडातील ऋद्धिपूर (ता. मोर्शी; जि. अमरावती ) या ठिकाणाहून द्वारकेस गेलेल्या श्री गोविंद प्रभूंची व त्यांची गोमती नदीच्या किनारी भेट झाली. चांगदेव राऊळांनी त्यांच्या मस्तकावर सूप ठेवून व हातातील खराट्याने पाठीवर हाणून त्यांच्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा संचार केला. या पद्धतीने त्यांनी ५२ लोकांवर अनुग्रहं केल्याचा उल्लेख आढळतो. चांगदेव राऊळ नेहमीच आपल्या हाती सूप व खराटा ठेवीत व द्वारकेचे रस्ते झाडूनझुडून स्वच्छ करीत असत. श्रीकृष्णाच्या द्वारकेचे सेवाव्रतच जणू त्यांनी आरंभिले होते. पूर यावेळी त्यांच्यावर एक बिकट प्रसंग आला. काउरळी येथील कामाख्या नावाची योगिनी त्यांच्या दाराशी, विषयसुखाच्या तृप्तीच्या इच्छेने धरणे धरून बसली. चांगदेव राऊळाची प्रवृत्ती ब्रह्मचर्यनिष्ठेची असल्यामुळे त्या स्त्रीचा i रतिचिया चाडा' चा दुराग्रह पाहून त्यांनी देहत्याग केला व ' श्री चक्रपाणी राऊळी योगाभ्यासे ते पूर त्येजौनि : आणिक पूर धरीले : कव्हणी एक प्रधान पुत्र आधीचि काळधर्मा गेला होता : तीयेचि सर्वे तेथौणि योगाभ्यासे आपले त्यजूनि गुजरातेचेया प्रधान पुत्राचे पतीत उठऊनि स्वीकारले : मृत हरिपाळ देवाच्या देहात प्रवेश करून हेच श्री चांगदेव राऊळ चक्रधररूपाने अवतीर्ण झाले. एका हटयोगिनीच्या विचित्र हट्टामुळे चक्रपाणींना आपला अवतार द्वारावती येथे ६३ वर्षे ' राज्य करून' संपवावा लागला. या अनपेक्षित पण महत्त्वाच्या प्रसंगावरून त्यांचे महापुरुषत्व आणि अलौकिक व्यक्तिमत्त्व सिद्ध होते. महानुभाव पंथाने मानलेल्या चांगदेव राऊळ या तिसऱ्या अवतारानेच पुढे श्री चक्रधर या पाचव्या अवताराचा स्वीकार केला. म्हणजे 'द्वारावतीए चांगदेव राऊळ' व 'प्रतिष्ठानी चांगदेवो राऊळ' एकच होत. चांगदेव राऊळांच्या या अल्पशा जीवनलेखावरून