पान:अभिव्यक्ती.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्री चांगदेव राऊळ : चरित्र शोध / ५७ त्यांच्या ठायी नैष्ठिक ब्रह्मचर्य, अलौकिक महामानवत्वं ज्ञानसंचारशक्ती इत्यादी गोष्टी होत्या एवढेच नव्हे तर वयस्तंभिनीसारखी महाविद्या अवगत असलेले व ती श्री चक्रधरांना देणारे ‘उधळीनाथ' यांच्यासारखे सच्छिष्य त्यांना होते. साक्षात श्री दत्तात्रेय प्रभूंचा अनुग्रह त्यांना लाभलेला असून महात्म्याला साजेशी सूप आणि खराटा हाती ठेवण्याची त्यांची लोकविलक्षण वृत्ती होती. श्रद्धेने व निःसंकोचाने झाडलोट करून आपल्या श्रीकृष्णाची द्वारका ते स्वच्छ ठेवण्याच्या मिषाने दास्य करीत. १ 'लीळाचरित्र एकांका'तील पहिल्यावहिल्या लीळातून कालविषयक जाणिवेचा हा अभाव चांगलाच जाणवतो? असे डॉ. तुळपुळे यांचे प्रतिपादन वस्तुस्थितीनिदर्शक आहे. कारण चांगदेव राऊळांनी फलटण येथे कन्हाडे ब्राह्मणाच्या घरी अवतार केव्हा स्वीकारला ? - त्यांच्या ठिकाणी देवगिरीवर श्री दत्तात्रेय प्रभूंनी शक्तिसंचार केव्हा केला ? त्यानंतर ते द्वारावतीस किती काळ होते ? गोविंद प्रभूंना ते केव्हा भेटले, त्यांच्या चरित्रातील कामाख्येचा प्रसंग नेमका केव्हाचा ? इत्यादी प्रश्नांविषयी 'एकांक' वाचूनही आपणास नीट बोध होत नाही. ' पुरस्वीकार ' : एक पुर्नावचार ! लीळाचरित्र एकांकातील 'पुरस्वीकार' ही क्रमाने पाचवी लीळा. चक्रपाणी चरित्राचे आकलन करून घेत असताना मला या लीळेत एक शंकास्थान आढळले आणि या लीळेतील आशयाचे एक वेगळे प्रतिपादन रूप माझ्या मनामध्ये धारण करू लागले. ही लीळा चक्रधरांच्या अवतार स्वीकाराची असून तीत गुजरातच्या प्रधानाचा मृत पुत्र हरिपाळदेव याच्या शरीरात चांगदेव राऊळांनी प्रवेश करून जो नवा अवतार धारण केला त्याचा वृत्तान्त आलेला आहे. 'पुर स्वीकरीले आवघेयाही हरीखु जाला' केवळ असा उल्लेख या लीळेत आहे. येथे. नेमके कुणी पुर स्वीकारले याचा उल्लेख नाही. मात्र लीळा क्रमांक चार श्री प्रभू भेटी कामाख्या गमन' मध्ये याबाबतचा स्पष्ट उल्लेख आहे की चांगदेव राऊळांनीच हरिपाळदेवाच्या मृत शरीरात प्रवेश करून चक्रधर अवतार धारण केला. 'तिएचा ( कामाख्येचा ) आग्रह देखोनि ते पुर त्यजिले : तिए समई गुजरातेचेयां प्रधानाचेया कुमाराचे देह गेलें : ते समसाना आणिले होते : तेव्हळि ते स्वीकारिले : ' या उल्लेखा- वरून वस्तुतः कोणतीही शंका शिल्लक राहात नाही. पण ' पुरस्वीकार' या लीळेत 'प्रधान कुशळु : तेणें दरे दरकुटे सोधविले : पुरुषे उठविलें असेल : ' हरि- पाळदेवाचे वडील श्री विशाळदेव प्रधान मोठे कुशल होते. त्यांना संशय आला एखाद्या सिद्ध, योगी पुरुषाने वा ईश्वरी अंशाने तर आपल्या मुलाच्या मृतदेहात १. प्रामुख्याने लीळाचरित्र एकांकातील लीळा क्रमांक १, २, ३, ४, १०, २५ वरून ही माहिती मिळते २. लीळाचरित्र - एकांक : संपादक डॉ. शं. गो. तुळपुळे (पृष्ठ २४ )