पान:अभिव्यक्ती.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्री चांगदेव राऊळ : चरित्र शोध / ५५ या लीळांचा आधार घेण्याचे कारण त्या ' एकांका' तील आहेत म्हणून. कारण डॉ. वि. भि. कोलते यांच्यासारख्या अधिकारी अभ्यासकाच्या दृष्टीने या ' एकांक — भागातील लीळा स्वतः श्री चक्रधरांनी कथन केलेल्या मानल्या आहेत. चांगदेव राऊळांचे चरित्र श्री चक्रधरांची पूर्वावतार परंपरा अवघ्या चार लीळांत आणि तीही अत्यंत संक्षिप्तपणे, लीळा क्रमांक १ ते ४ मध्ये सांगितलेली आहे. चक्रधरांच्या जीवनाच्या पूर्वभागाच्या या कथनात गुरुपरंपरेचा उल्लेख आलेला आहे. श्री दत्तात्रेय प्रभू हे ईश्वरावतार असून त्यांनी आरंभी अवतार धारण करून स्वतंत्रपणे पर व अवर अशा दोन्ही शक्तींचा स्वीकार केला. त्यांचे निवासस्थान नेहमी सह्याद्री पर्वतावरील माहूर ( मातापूर ) जवळच्या 'देवगिरी' पहाडात असल्यामुळे ते देवदेवेश्वरस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र ते अदृश्य असल्यामुळे त्यांचे दर्शन दुर्लभ होते. फक्त अधि- कारी जीवांना ते क्वचित निरनिराळ्या वेशात दर्शन देत असत. दत्तात्रेय प्रभूने फलटण येथील एका कऱ्हाडे ब्राह्मणाच्या कुळात जन्मलेल्या चांगदेव नावाच्या पुरुषाला तो देवगिरी येथे आला असताना असेच वाघाच्या रूपात दर्शन दिले. त्याच्या मस्तकावर आपला चवडा ठेवून त्याच्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा संचार केला. शक्तीस्वीकारा- नंतर चांगदेव हे या आदिगुरूंचे अनुगृहीत झाले.. हेच द्वारावतीकार चांगदेव राऊळ वा चक्रपाणी होत. ' द्वारावतीकार चांगदेव राऊळ ' हे आच्छादनी अवर दृश्यावतार होत. त्यांना दत्तात्रेयापासून बोध झाला तेव्हा शक्ती स्वीकाराच्यावेळी त्यांनी 'पर आच्छादिले : अवर प्रगटिले ' या उभयशक्ती लाभूनही त्यांनी यक्षिणीपासून तो चैतन्यमायेपर्यंतच्या म्हणजे ' अवर' शक्तीचा स्वीकार केला. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील जनकनायक व जनकाइसा या कहाड़े ब्राह्मण दांपत्याचा हा पुत्र. याच्या नामकरणामागे मौजेची अशी खास घटना आहे. या दांपत्याला वरेच वर्षांपर्यंत मूलबाळ नव्हते म्हणून जनकाइसेच्या माहेरच्या मंडळींनी तिला पुत्र व्हावा म्हणून 'चाकण' च्या चक्रपाणी नावाच्या दैवताला नवस केला. जनकनायकानेही पुत्रप्राप्तीसाठी ' चांगदेव ' नावाच्या दैवताला नवस केला. हे दोन्ही नवस फलद्रूप पावले. यावरून या मुलाला ' चक्रपाणी' व ' चांगदेव ' अशा दोन्ही नावांनी संबोधिले जाऊ लागले. पुढे ' चांगदेव राऊळ' हे नाव अधिक रूढ झाले. चक्रपाणी : अलौकिक व्यक्तिमत्त्व ' चक्रपाणींच्या जीवनातील व्रतबंध, विद्याभ्यास, कमळवदनेशी विवाह व वडिलांच्या व्यापार - उदिमात सहयोग हा नित्य परिचित घटनाक्रम. मात्र जीवनातील या पूर्वार्धानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्व प्रगट होऊ लागले. भाताची रास १. संदर्भ : 'प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास' भाग १ (पूर्वार्ध) : प्रा. डॉ. अ. ना. देशपांडे