पान:अभिव्यक्ती.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ / अभिव्यक्ती फक्त पाच प्रमुख अवतार मानलेले आहेत. १. श्रीकृष्ण चक्रवर्ती, २. श्री दत्तात्रेय प्रभू, ३. श्री चांगदेव राऊळ, ४. गुंडम राऊळ, ५. श्री चक्रधर यांना 'पंचकृष्णा- वतार' अशी संज्ञा रूढ आहे. यांतील पाचवा श्री चक्रधरांचा अवतार हा 'उभय- दृश्यावतार' म्हणजे त्यांच्या ठायी 'पर' आणि 'अपर, अशा दोन्ही शक्ती (विद्या) असल्यामुळे ते ' सर्वज्ञ' म्हणून सर्वश्रेष्ठ अवतार मानले जातात. " हा श्री चक्रधरांचा अवतार म्हणजेच श्री चक्रपाणी किंवा श्री चांगदेव राऊळ यांनी ' भडोच ' येथील विशाळदेव नावाच्या प्रधानाचा पुत्र 'हरिपाळदेव' याच्या मृतदेहात प्रवेश करून स्वीकारलेला देह असे मानले जाते. भाद्रपद शु ।। २ शके ११४२ या दिवशी त्यांनी पतित अवतार स्वीकारला असे मत प्रचलित आहे. ' हरिपाळदेवाच्या पतित शरीरात प्रवेश करून अवतार स्वीकारल्याने श्री चक्रधरांचा हा 'पतितावतार' होय. याचा अर्थ श्री चक्रपाणी किंवा चांगदेव राऊळ यांचे अवतारांतर म्हणजेच श्री चक्रधर म्हणूनच त्यांना ' चक्रधर चांगदेव राऊळ' २ श्री गोसावी इत्यादी चक्रपाणींच्याच नावाने लीळाचरित्रात अनेक ठिकाणी उल्लेखिले असावे. मूर्तिज्ञान, ( सं. ह. ना. नेने : पृष्ठ १९ - २० ), मध्ये याबाबत गुजरातेच्या प्रधानपुत्राचे ' उठउनि : श्री चांगदेवो राऊळी : गोसावी अवतार स्वीकरीला | असा उल्लेख आलेला आहे. लीळाचरित्र : एकांकातील लीळा , महानुभाव साहित्यसंपदेचे वैशिष्ट्य हे की त्यात जे खरे, अचूक व नेमके वा मोघम जसे असेल तसे सांगितलेले असते. जे अंधुक, अस्पष्ट नीटसे माहीत नाही तिथे बहुधा ' असे असावे' किंवा ' असे असावे' किंवा ' या दोन्हींपैकी कोणतेही नसावे' असे प्रामाणिक सत्य प्रतिपादनाचा प्रयत्न दिसतो. अकारण, अद्भुत, अवास्तव काल्प- निकतेवर वा श्रद्धेपोटी जन्मणान्या भडकपणावर कुठेही भर दिलेला आढळत नाही, हे या महानुभाव साहित्याचे वैशिष्ट्य. शिवाय 'एकीवासनाः दुजीवासनाः शोधू,' असे म्हणून मतांतरे व्यक्त केली आहेत आणि सांकेतिक लिपीबद्ध ते असल्यामुळे उलट केवळ शुद्ध स्वरूपात आज हे साहित्य उपलब्ध होऊ शकले म्हणून त्यातील उल्लेख कमालीचे वास्तवपूर्ण व विश्वसनीय वाटतात. म्हणूनच महानुभावपंथीयाला वंदनीय व आधार असलेल्या 'लीळाचरित्र' या आद्यचरित्रग्रंथातील चक्रपाणी चरितसंदर्भातील उल्लेख प्रस्तुत ठिकाणी आधारासाठी लक्षात घ्यावयाचे आहेत. १. काही महानुभाव ग्रंथकार ही गोष्ट शके १०७५ श्रीमुख संवत्सरी भाद्रपद शु ।। २ ला घडली असे नमूद करतात. डॉ. य. खु. देशपांडेही आपल्या 'महानुभावीय मराठी वाडमय ' या ग्रंथात या मताला अनुमती देतात २. चक्रधरस्वामी या अर्थाने 'श्री चांगदेव राऊळ' असा उल्लेख लीळाचरित्र पूर्वार्ध : भाग १ (संपा. तुळपुळे) मधील लीळा क्रमांक : २२, ३९, ८४, ९०, ११७, १७४, १७६ मध्ये आलेला आढळतो