पान:अभिव्यक्ती.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अकरा द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ ,

a शोध

महानुभाव पंथाने मानलेल्या पंचकृष्णावतारांचा विस्तृत जीवनकार्यपरिचय मराठी अभ्यासकाला मोठा उद्बोधक, उपयुक्त ठरणार आहे; पण आज या पंचकृष्ण अवतारांपैकी केवळ श्री. गोविंदप्रभू आणि श्री चक्रधरस्वामी' यांच्या जीवनकार्या- बद्दलची पुरेशी माहिती उपलब्ध आहे. या पंथातील १. कृष्ण, २. श्री दत्तात्रेय, ३. श्री चक्रपाणी उपाख्य श्री चांगदेव राऊळ या अवतारांबद्दल मात्र भरपूर सुस्पष्ट, सलग अशी पंथीय संदर्भातील माहिती उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही. त्यांची चरित्रे जर उपलब्ध झाली तर प्रा. व. दि. कुलकर्णी यांनी 'लीळाचरित्र : एक अभ्यास' या ग्रंथाच्या उपसंहारात म्हटल्याप्रमाणे निश्चितच त्यांच्या पठणानंतर— — तं च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुत हरेः । विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः ॥ ' असा प्रसन्नतेचा प्रत्यय आल्याखेरीज राहाणार नाही. म्हणूनच प्रस्तुत लेख श्री चक्रपाणी वा द्वारावतीकार चांगदेव राऊळ यांच्या जीवनचरित्राबद्दल शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंचकृष्णावतारांपैकी तिसरा अवतार श्री चक्रपाणी परमेश्वर निराकार असूनही जीवाच्या उद्धरणासाठी त्याला 'अवतार' घेणे अटळ आहे ही महानुभाव पंथाची विचारसरणी असल्यामुळे परमेश्वराने अनादी - कालापासून अविद्येच्या बंधनात जखडलेल्या ' बद्धमुक्त' जीवांना 'मुक्त' करण्या- साठी अनेक अवतार धारण केले असे ते मानतात. यांपैकी महानुभाव पंथियांनी १. यांचा उल्लेख 'श्री गोसावी,' सूत्रपाठात म्हटल्याप्रमाणे 'जैसे प्रतिष्ठानी श्री चांगदेवो राऊळ' या नावानेही केलेला आहे. डॉ. वि. भि. कोलते यांचे श्री चक्रधर चरित्र इ. स. १९५२ व संपादित श्री गोविंदप्रभू चरित्र इ. स. १९४४ हे दोन महत्त्वपूर्ण ग्रंथ व विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले लेख यांवरून विशेष माहिती या दोन अवतारांबद्दल उपलब्ध झाली आहे