पान:अभिव्यक्ती.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ / अभिव्यक्ती समारोप मुक्तेश्वराचे मूळ नाव मुद्गल, त्याच्या पित्याचे नाव बाळकृष्ण ऊर्फ चिंतामणी. ' लीला विश्वंभर' हे त्याच्या मातापित्याचे नाव नसून श्रीगुरू दत्तात्रयाचे नाव आहे. कवीने महाभारत रचनेच्या वेळी गुरूच्या आज्ञेने मुक्तेश्वर हे त्याच्या दैवता नाव धारण केले. तत्पूर्वी तो 'चितामणिसुत मुद्गल' नावाने काव्य लेखन करीत असे. तो एकनाथांची कन्या गोदा हिचाचं पुत्र ! " गोदावरी तट निवासी । अत्रिगोत्री पवित्र ऋषी । चिंतामणी गुणकरांशी । पासाव जन्म जयाचा || २ || तो 'मुद्गल' चितामणिसुत । लीलाविश्वंभर जगविख्यात । व्यास भारतीचा अर्थ । महाराष्ट्र वोलिला ।।" अशी ग्वाही स्वतः मुक्तेश्वराने सभापर्वाच्या सतराव्या अध्यायात दिलेली आहे. असे हे मुक्तेश्वरचरित्रविषयक शोधाच्या परामर्शाचे स्वरूप आहे. काल- खंडदृष्ट्या मुक्तेश्वर फार प्राचीन कवी नाही, तरीही त्याच्या चरित्रविषयक माहितीची ही परवड पाहिली म्हणजे नव्याने मुक्तेश्वर जीवन आणि चरितविषयक संशोधनाची आवश्यकता विशेष जाणवते. 34 34