पान:अभिव्यक्ती.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दहा कलाकवी मुक्तेश्वर : चरित्रविषयक शोधाचा परामर्श चरित्रविषयक अपूर्ण शोध मुक्तेश्वराच्या चरित्र आणि लेखनसंपदेच्या संदर्भात विपुल लेखन झालेले आहे. पण ते सारे बव्हंशी मुक्तेश्वरी काव्याच्या संपादनाच्या संदर्भात आणि वाङमयाचे इतिहास लिहिणाऱ्या लेखकाच्या गरजेतून ! स्वतंत्रपणाने मुक्तेश्वराच्या चरित्र- विषयक सर्वच प्रश्नांचा ध्यास घेऊन, संपूर्ण हयात वेचून मुक्तेश्वरचरित्रविषयक संशोधन झाल्याचे मात्र अद्याप आढळत नाही.. मुक्तेश्वर एक श्रेष्ठ कलाकवी म्हणून वादातीत मान्यता पावलेला श्रेष्ठ कवी असला तरी त्याचे जीवनकार्य सदाचेच वादविषय बनून राहिलेले दिसते. वस्तुतः मुक्तेश्वर हा खूप प्राचीन लेखक आहे असेही नाही. शिवपूर्वकाल वा शिवकालातील हा कवी. त्याचे आजोबा संत एकनाथ यांच्याबद्दल अचूक माहिती उपलब्ध आहे. पण मुक्तेश्वराबद्दल मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही. याचे गूढ उलगडत नाही आणि आश्चर्यही वाटते. - प्रश्नांकित चरित्र मुक्तेश्वराच्या चरित्रातील एकही गोष्ट अशी नाही की जिच्याबद्दल ठाम पणाने काही सांगता येईल. जन्म केव्हा झाला ? कुठे झाला ? मृत्यू केव्हा ? आणि कुठे झाला ? यांचा वंश नेमका कोणता ? गुरुपरंपरा कोणती ? वाङ्मयावर संस्कार कोणाचे ? वाङ्मयीन व्यक्तित्व कुठे आणि कसे घडले ? वाङ्मयीन संपदा किती ? त्यातील क्रम कोणता ? म्हणजे ' मुक्तेश्वर' ह्या नावापासून, त्यांच्या आईच्या नावापासून तो थेट त्यांच्या नावावरील साहित्यांपर्यंत अनिश्चितता आहे. अं. ४