पान:अभिव्यक्ती.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ / अभिव्यक्ती (४) शके १२७० पासून तुर्काणांची सत्ता सुरू झाली. निकामलिक . ( याच्या वतीने भागडचुरीने राज्य पाहिले ) लाहूरशा ( : दुसऱ्या नागरशाचा हा पुत्र : . शके १२७० ते १२७९ : ९ वर्षे याने राज्य केले. ) (५) नायत्यांचे राज्य स्थापन झाले ( शके १२७९ १३५१ : ७२ वर्षे कारकीर्द ) ( भोंगळे यांच्या दंग्याला सतत २० वर्षे सामना द्यावा लागला . ) ( ६ ) जफरखा डफरखा ( अहमदाबादेचा सुलतान अहमदशहाचा हा पुत्र ) ( शके १३५१ ते १३७६ : २५ वर्षे राज्य याने केले. ) यानंतर अमलदारांच्या करवी राज्य चालू लागले. बहादूरशहा, अहमदशहा यांचे राज्य चालू होते, सुस्थिर झाले होते. ( ७ ) महमदशहाबेगडा याची कारकीर्द १३७६ ते शके १४३४ पर्यंत म्हणजे ५८ वर्षे होती. याच काळात फिरंग्यांचा प्रवेश झाला. हिंदू वा मुसलमान धर्म वर्ज्य मानून गोव्याला लोकांची रवानगी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सिनारेदस्कार, बोजिजुझ, कॅप्टन लोरेस, लुईस देतात्र यांची सत्ता बळ धरीत होती. माहीम प्रांतात झालेल्या परंपरांचा स्वतंत्रपणे अन्वय लावून महिकावतीच्या * बखरीतील राजकीय वंशावळीच्या उकलीचा हा यत्न अभ्यासकांना साहाय्यभूत. होईल या अपेक्षेने दिला आहे. प्रमुख संदर्भ : महिकावतीची ऊर्फ माहीमची बखर : कै. वि. का. राजवाडे. चित्रशाळा (पुणे); शके १८४६