पान:अभिव्यक्ती.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० / अभिव्यक्ती पुरेसे ठाम आणि निश्चित, विश्वसनीय पुराव्यावर आधारित संशोधन जोपर्यंत मुक्तेश्वराबद्दल उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपणास उपलब्ध संशोधनाचाच केवळ परामर्श घेणे भाग आहे. मुक्तेश्वराचे चरित्र आणि वाङ्मय या दोन्हीही संदर्भात अनेक नामवंत प्राचीन साहित्यसंशोधकांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. त्यात विपुलं मते आणि मतांतरे आढळतात. विविध भूमिका मुक्तेश्वर हा शिवपूर्वकालीन म्हणजे त्याचा जन्म शके १४९५ (ते १५०० ) मध्ये झाला असे मत कै. पांगारकर, वैद्य, प्रा. शेणोलीकर यांनी मांडले आहे. मुक्तेश्वराच्या लेखनाचा भाषिक अभ्यास हा या मंडळींचा प्रमुख पुरावा आहे. अर्थात भाषाविशेष हा स्थूल कालखंड समजण्यात महत्त्वाचा पुरावा मानायला काहीच हरकत नाही. या संदर्भात आणखी एक पुरावा म्हणजे कवी मुक्तेश्वरापासून चौथ्या पिढीतील 'मुक्तेश्वरबुवा गवई' यांना कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांकडून 'तेरवाड' गाव इनाम दिल्याची जी सनद मिळाली आहे तिचा शक १६४९ आहे. अर्थात हा बाह्य पुरावा आहे. मुक्तेश्वराच्या वंशजांच्या वंशा- वळीमध्ये संत एकनाथांची जी मोठी मुलगी गोदा ( तथा लीला ) ही त्यांची आई असून तिचा जन्म शके १४८४ मध्ये झाल्याचे नमूद केलेले आहे. पूर्वीच्या विवाह - कालाचा विचार करता वयाच्या सोळाव्या वर्षी गोदेला मुक्तेश्वर झाला असावा.. म्हणजे वयाची २१ वर्षे मुक्तेश्वरांची संत एकनाथांच्या संस्कारात आजोळी गेली असावी. एकनाथांच्या भावार्थ रामायणाचा परिणाम मुक्तेश्वराच्या आरंभीच्या लेखनावर झालेला जाणवतो. हेही त्यांच्या संस्काराचे गमक मानता येईल. यावरून . मुक्तेश्वराचा जन्म. व त्याचे महत्त्वाचे काव्यलेखन पैठणला झाले असले पाहिजे. मुक्तेश्वरांच्या भोवताली संतपणाचे वलय किंवा संप्रदायाचा मार्ग नव्हता. त्यामुळे त्यांची माहिती लोप पावत गेली असली पाहिजे. रामदास पंचवटीत अनुष्ठान करीत होते त्यावेळी नाथांचा नातू मुक्तेश्वर हा पैठणास महाभारताच्या अंगावर मराठी वेष चढविण्यात गुंग झाला होता. 'अमुची देशभाषा मराठी | वास्तव्य प्रतिष्ठान गोदातटी ।। ' ( पृ. ७७ ) असे ल. रा. पांगारकरांनी प्राचीन मराठी - वाङ्मयाच्या रामदास खंडात म्हटले आहे. जन्म शके १४९६ दा. के. ओकांनीही मुक्तेश्वरांच्या जन्माच्या वेळेला संत एकनाथ यात होते असे मानले असून त्यांनी त्यांच्या तोंडात खड़ीसाखर घालून आशीर्वाद दिल्याचे नमूद केले आहे. पण त्याला सबळ विश्वसनीय पुरावे नाहीत. पंगु यांनी पांगार- कर आणि चिंतामणराव वैद्य यांच्या मतानुसार नाथांच्या निर्वाणसमयी त्यांचे वय २५ वर्षांचे असावे, असे मानले आहे म्हणजे शके १५२१-२५. १.४९६ च्या