पान:अभिव्यक्ती.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६/ अभिव्यक्ती — शके १०६० तील प्रतापबिंबाच्या आगमनापासून शके १४६० च्या सुमारास पट्टेकरास फिरंग्यांनी स्थानभ्रष्ट करीतोपर्यंतची हकीकत बखरकाराने वर्णिली आहे तीवरून दिसते की, या ४०० वर्षांत बिंब राजे, नागरशादी राजे, बिंबदेवादी यादव राजे, नायते राजे, दिल्लीचे मलिक, अहमदाबादचे मलिक व फिरंगी अशा सात परंपरा राज्य करणाऱ्यांच्या माहिम प्रांतात झाल्या. अनेक राजांची नावे आणि त्यांचे. नाते आणि आपसातील संबंध बरेचसे घोटाळ्यात टाकण्यासारखे आहेत. नावांची पुनरुक्ती - विशेषतः गाजलेल्या - हे तर इतिहासकालात सर्वत्रच घडलेले, इथेही दिसते. मालाड ऊर्फ म्हालजापूर येथे ३६५५ लोकांना, जे लोक केळव्यापासून मुंबईपर्यंतच्या विविध गावांहून आलेले होते, एकत्र जमवून २१ दिवसपर्यंतचा तळ ठोकून देसला नायकोराव याने श्री केशवाचार्यांच्या मुखाने राजबबापासून अद्ययावत वंशपद्धती कथन केली व महाराष्ट्रधर्मनिरूपण केले. त्याच्या ६६ नकला करून वाटल्या. अशी या बखरीची जन्मकथा आहे. या बखरीतील कालाचे अचूक व बारीकसारीक तपशील, स्थलवाचक माहिती, व्यक्तिनामांची माहिती अनेक दृष्टीने विश्वसनीय आहे. 'घण- 'दिवी' पासून चेऊलपर्यंतच्या समुद्रकिनान्यालगतच्या गावांचा, महाराष्ट्र व गुजराथ ह्या बाहेरच्या भागातील, उत्तर हिंदुस्थानातील गावांचा काहीसा उल्लेख या बखरीत आलेला असून मुख्यत्वेकरून पश्चिम किनाऱ्यापासून तो पूर्वेकडील सुमारे १५-२० मैल रुंदीच्या भागातील हकीकती आलेल्या आहेत. बखरीत आलेल्या सात परंपरांची उकल पुढीलप्रमाणे केलेली आहे : (१) बिंबराजे ( एकूण १०३ वर्षांची राजकीय कारकीर्द ) कामाई गोवर्धन बिब ↓ प्रताप बिंब ↓ (शके १०६० ते १०६९ : ९ वर्षे राज्य केलें ) - महिबिब (हरदपुरोस याची मदत झाली ) | ( शके १०६९ ते ११३४ : ६५ वर्षे राज्य) केशवदेव ↓ (शके ११३४ ते ११५९ : २५ वर्षे राज्य ) प्रधान जनार्दन ↓ (शके ११५९ ते ११६३ : ४ वर्षे राज्य). घणदिवीचा नागरशा प्रधान जनार्दन (शके ११६३ ते १२१६ : ५३ वर्षे राज्य ) ( चेऊल = चंपावती > पुत त्रिपुरकुमार केशवदेव नानाजी → मेहुणेविकोजी बाळकोजी चेऊलचा राजा दुसरा नागरशा x प्रतापशा यांचे साहाय्य या कारकीर्दीत लाभले