पान:अभिव्यक्ती.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नऊ महिकावतीची बखर : राजकीय वंशावळीची उकल " 'महिकावतीची बखर' ही मराठी वखरवाङमयाच्या ज्ञात इतिहासात उपलब्ध झालेली पहिली बखर आहे. संशोधनाचार्य आणि आदर्श संपादक कै. वि. का. राजवाडे यांनी अत्यंत दुर्मिळ व अज्ञात अशा राजकीय घराण्यांच्या- वंशाच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणारी प्रदीर्घ प्रस्तावना लिहून ती प्रकाशित केली. शके १८४६ ( इ. स. १९२४) मध्ये पहिल्यांदा ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर अगदी अलीकडे श्री. रा. चिं. ढेरे यांनी ६ ऑक्टोबर, १९७३ साली या बखरीची सुसंपादित प्रत काढली. मात्र विस्तारभयास्तव त्यांनी आपल्या प्रतीत बखरीतील विषयांच्या ऐतिहासिकतेसंबंधीचे विवेचन केलेले नाही. अन्यथा अतिशय उत्तम मूल्यमापन करणारी आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारी प्रस्तावना (साठ पृष्ठे ) त्यांनी लिहिलेली आहे. प्रस्तुत बखरीचे ऐतिहासिक महत्त्व वादातीत आहे. उलट उत्तमतन्हेने ऐतिहासिक सत्य ज्ञात असूनही पुराणपद्धतीने सांगितले तरच ते लोकमान्य होते, जनश्चिसंवाद राखते या पुराणदृष्टीतून सर्व इतिहासाचे लेखन झालेले असल्यामुळेच या वखरीतून इतिहास राजकीय वंश घराण्यांच्या परंपरा, महाराष्ट्रातील नेमका भौगोलिक परिसर, त्यांची त्या त्या वेळी रूढ असलेली नावे, कालखंड इत्यादी गोष्टींचा नेमका बोध होणे काहीसे अवघड व संशोधनाला वाव असणारे झाले आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांचे ऋण या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. बखरीचे शीर्षक, प्रकरणांची कालानुक्रमे संगती व शीर्षके, त्यांचे रचनाकार, रचनेमागील हकीकती, पौराणिकीकरण, महाराष्ट्रधर्माचे विवेचन, वाङ्मयीन विशेष इत्यादी गोष्टींचा विचार हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही. या बखरीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपापसातील, जाती-जातीतील उपजाती, पोटभेदांतील शाखोपशाखेतील कितीतरी गोष्टींवर अगदी नव्याने प्रकाश टाकून आपले सगळे दुराभिमान जिरवून टाकणारी अशी ही महत्त्व - पूर्ण खबर आहे. म्हणून या बखरीतील राजकीय वंशावळीचे सूत्ररूपाने सुलभ दिग्दर्शन करण्याचा केवळ हा प्रयत्न आहे. आज इतिहासाने जिथे मौन पाळलेले आहे तिथे ही बखर बरीच बोलताना दिसते.