पान:अभिव्यक्ती.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ / अभिव्यक्ती थकून परतणाऱ्या तिसऱ्या पाळीच्या कामगारासारखे विचार -' 'रातभर उवळणाऱ्या अस्थम्यासारखा अस्वस्थ जीव - 'पेन्शनरासारखी स्मृती उजळीत . भोकाड पसरणारे मन.. 'कोसळणाऱ्या विजेचे वळून पाहाणे. 'पोक आलेल्या म्हाताऱ्या घरात .. 'चुलाण्यात फटफटावे लाकूड तसा आत्मा चरफडू लागतो -' 'उनाड पोराने कलंडावी दौत तसा हा निळा सागर -' इत्यादी. श्रेष्ठ, खरा कलावंत आपल्या स्वतःच्या खास भाषेत बोलतो, नव्या अनुभवा- बरोवर नवी परिभाषाही रूढ करतो. . . . . वरील प्रतिमा सुर्व्यांच्या या गुणाची साक्ष देऊ शकतील. हे एक असे झाले. बेइमान स्वानुभवाशी झाले नाहीत. आकाशावर अवलंबून राहायची आणि उगीचच कुणालाही सलाम ठोकण्याची या कवीची प्रवृत्ती नाही. त्याचा सलाम फक्त येणान्या नवसमाजरचनेसाठीच आहे. स्वतः च्याकरिता स्वतः प्रमाणेच रचित जाण्याची या कवीची समजूत आहे. म्हणूनच या कवीला नेहमीच वाटत आले आहे की 'एकदाची कापावी नाळ पण तरीही मनापासून पुन्हा वाटते. 'भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र 4 आम्हीही कुणाची याद केली असती-' पण शेवटी --' असा कसा दगड झालो' हे आणि या - 'मुसाफिराची वाट कोणीकडून कोणीकडे ' हेच समजत नाही. 'कधीतरी स्वतःचा प्रकाश मिळेल' जगता आले नाही तरी ' शब्द शब्द ' जागवण्यात सामर्थ्य त्यांनी मानले. ' शब्द वितळल्याच्या घोषणा करणाऱ्यांचा' यासाठीच त्यांना तिटकारा आहे. रसवंतीची अस्मिता जपणारा हा कवी ' बेतलेल्या जीवनाला झिडकारतो. या ' कर्ज पुत्त्रा' च्या ' सूर्य गोंदल्या हाताची ' हीच कर्तृत्वाची चमक ! आयुष्यभर स्वागताला पेटते निखारे आले तरी जीवनाशी तडजोड ठाऊक नाही. झूट बोलन आयुष्य कुणालाही सजवता येते' पण कवीची ती इच्छा नाही. उलट जमलेल्या दोन अश्रूंसह ही कथा त्यांचे शब्द सांगतात - 'सबद लिखना बडा सोपा है- सबदा साठी जीना मुष्किल है । म्हणूनच ते म्हणतात, 'शब्दांनो ! सावध असा; सक्त पहारे बसलेत, तुम्ही दिलेले चंद्र त्यांच्या डोळ्यांत खुपलेत ' आपल्या शब्दांप्रमाणेच ते आशयालाही सावध असायला सांगतात. कारण सत्य टिपणाऱ्या आशयाने ' आजवरचे कलथलेत उजेड । ' भणंग युगाच्या सूक्ष्म संवेदना टिपणान्या हृदयालाही ते सावध करतात. कारण इतरांनी शोधलेल्या साखळदंडालाही त्यांना जुमानावयाचे नाही. अवघ्या 'चार शब्दां' तच ते खडसावतात- " एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे. सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे ' असे आहेत 'सावध' नारायण सुर्वे !