पान:अभिव्यक्ती.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आठ

कोनानुसार भरून काढतो, सूचित असलेले सूत्र वाढवितो अथवा इतस्ततः विखुरलेलेकण लागत नाही अथवा ते कोणाकडे मागावे लागत नाही. नाट्यादी ललित साहित्याचाजन्म झाला तेव्हापासून ते अस्तित्वात आहे. म्हणून या संबंधात होणारी पुष्कळशीटीका फुकाची आणि साहित्याच्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करणारी असते. श्री. गिरधारीयांनी या संबंधात केलेले विवेचन समतोल साधणारे आणि बहुतांशी निरपवादअसेच आहे.कोल्हटकरांच्या नाटकांतील सामाजिकता लेखक म्हणतात त्याप्रमाणे कृतकआहे याबद्दल दुमत होणार नाही. हा विचार अनेकांनी, त्यांच्या शिष्यांनीही केव्हाचमान्य केलेला आहे. पण केशवसुतांची वैचारिकता चिरंतन विषय सोडून समकालीनसामाजिक संघर्षात घुसते तेव्हा त्यांच्या कवितेचा कस कमी होतो हे मत मला विवाद्यवाटते. कालिक संदर्भ तुटले तरी तुतारी, स्फूर्ती, नवा शिपाई यांसारख्या कवितांचेरसात्मक आवाहन कमी होत नाही, आज झालेले नाही. गडकऱ्यांच्या 'दसरा 'मध्येअथवा बालकवींच्या 'धर्मवीरा 'मध्ये - आशयरचनेत साम्य असूनही - आवाहनआपल्याला जाणवत नाही. आशय वाचकांच्या मनात रुजविणारे हे कवितेचे सामर्थ्य तसे व्याख्यातीतच असते. या सामर्थ्याच्या आश्रयाने प्रगट होणारे विचार हे नुसतेविचार राहातच नाहीत. कवीच्या व्यक्तिगत अनुभवांच्या भट्टीमध्ये त्यांना भावरूप प्राप्त झालेले असते. अशा काही मतभेदांना वाव असला तरी आणि समीक्षात्मक लेखात अपरिहार्यच आहे – संग्रहातील अनेक लेख गिरधारीच्या अभ्यासू बैठकीची, साहित्या-वरील प्रेमाची आणि त्यांच्या अंतरंगाचा शोध घेण्याच्या भूमिकेची साक्ष देणारेआहेत असे मला वाटते. या क्षेत्रातील पुढील प्रवासासाठी, स्नेहाच्या भावनेने माझ्या सदिच्छा मी त्यांना सादर करतो. - २५ नोव्हेंबर, १९७६ वि. वा. शिरवाडकर