पान:अभिव्यक्ती.pdf/४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
"शुभारते..."

 नाशिकच्या हं. प्रा. ठा. कॉलेजमधील मराठीचे प्राध्यापक श्री. गिरधारी हे आपल्या समीक्षात्मक स्फुट लेखांचा हा संग्रह वाङमयाच्या अभ्यासकांना आणि चिकित्सक वाचकांना सादर करीत आहेत. साहित्यप्रांतातील त्यांच्या या पहिल्याच मुशाफरीला “शुभास्ते " इच्छिण्यासाठी हे चार शब्द.
 प्रस्तुत संग्रह छोटा असला तरी त्यातील विषयांची व्याप्ती खूपच मोठी आहे. यात महानुभाव चांगदेवांचा विचार आहे. तसा केशवसुत - अनिलांचाही आहे. मुक्तेश्वरांचा आहे तसा नारायण सुर्त्यांचाही आहे.
 काव्य आणि नाटक हे गिरधारीच्या चिंतनाचे आणि व्यासंगाचे विशेष आवडते विषय असले तरी कथा, कादंबरीच्या क्षेत्रातही त्यांच्या चिकित्सेने संचार केला आहे, वाङमयीन मूल्यांचा शोध घेतला आहे. कोल्हटकर, वरेरकर, खांडेकर वर्तक इत्यादी नव्या-जुन्या लेखकांच्या कलाकृतींचा वेगवेगळया भूमिकांतून त्यांनी परामर्श घेतला आहे.
 ललित साहित्यातील पौराणिकतेसारख्या तात्त्विक विषयांची मीमांसाही त्यांनी केली आहे. यातील काही लेख सांगोपांग विवेचन करणारे तर कित्येक एखादाच म्हणजे टिपणवजा आहेत. परंतु बहुतेक लेखांतून प्रा. गिरधारी यांची चौरस रसिकता आणि साहित्य व्यवहारातील विविध प्रश्नांचा शोध घेण्याची प्रवृत्ती आणि समर्थता दिसून येते.
 ललित साहित्यातील पौराणिकता, केशवसुतांच्या काव्यातील वैचारिकता, चांगदेव राऊळ, मराठी संत, दिवाकर कृष्ण हे लेख मला विशेष महत्त्वाचे वाटले. विषयाची मार्मिक उकल करण्याची लेखकाची समर्थता या लेखांतून अधिक प्रकर्षाने प्रगट होते. साहित्यातील पौराणिकता, ऐतिहासिकता हे चिरंतन वादाचे विषय आहेत. इतिहासकथांच्या मानाने पुराणकथा अधिक दूरच्या, अधिक धूसर आणि अधिक अद्भुत असतात. बहुतेक पुराणकथांतून इतिहास, दंतकथा, संकीर्तन, प्रतीके, चमत्कार, सांस्कृतिक आग्रह इ. चे विवेक विरोधी आणि तरीही आकर्षक असे मिश्रण झालेले असते. पौराणिक वास्तव हे मर्यादित अर्थाने आणि स्थूल मानानेच वास्तव मानायला हवे. म्हणूनच ललित लेखकांच्या कल्पकतेला आणि स्वतंत्र आकलनाला तिथे भरपूर अवसर असतो. कालिदासाने शाकुंतलामध्ये अथवा भासाने प्रतिमामध्ये मूळ पुराणकथा कितीतरी बदलून टाकल्या आहेत. लोकांनी स्वीकारलेल्या स्थूल घटना सुरक्षित ठेवून ललित लेखक मूळ कथेतील रिकाम्या जागा आपल्या दृष्टि- मुद्दा मांडणारे