पान:अभिव्यक्ती.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

' सावध' नारायण सुर्वे / ४३ केव्हा केव्हा मला भ्रम पडतो. पण का कोण जाणे, तरीही मी आपला लिहीतच आहे व लिहीत राहाणार आहे. त्याशिवाय मला गत्यंतरच नाही... जेव्हा काळजातला ठणका बंद होईल, जेव्हा मला शब्दांसाठी अडून वसावे लागेल, (असाही दिवस येणार आहे.) तेव्हा मात्र मला थांबावेच लागेल.... 'मला वाटते यातच नारायण सुर्वे अभिजात कलावंत, जातिवंत कवी ( born poet ) असल्याची साक्ष पटते. 4 " जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे' हे सुर्व्याच्या बाबतीत संपूर्ण सत्य आहे. जीवनाशी कधीच बेइमानी न करता शब्दांच्या हाती फुले आणि खड्गे देत मराठी कवितेच्या सावध तुफानाला सुरुवात करणारी सुर्व्यांची ही कविता म्हणजे सारस्वतांसमोर केलेला थोडासा गुन्हा नव्हे तर ' कामगार आहे, मी तळपती तलवार आहे' ही जाणीवच खरी इथे महत्त्वाची आहे. ब्रह्मांडासही पाठीशी घालून दिक्का- लांच्या गाठी सोडवणारी - शुष्क फांद्यांना नवीन बहर आणि वेदनेला नवीन अर्थ देणारी सुर्व्यांची कविता मराठी नवकवितेचे 'क्षितिज' रुंदविताना दिसते. जन- भक्तीतच चिरंतन मुक्ती मानणाऱ्या या नव्या युगस्वामीची ' शब्दांच्या ईश्वराची ' ही कविता म्हणूनच सहृदयाला गलबलविणारी झाली आहे. या नारायणाला उद्याच्या युगाचे 'नसे तेथे खंत । नसे जात पंथ, अवघा सुपंथ । जीवनाचा' असे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र दोन दिवस वाट पाहाण्यात गेले. दोन दुःखात गेले' अशी वस्तुस्थितीची कबुली त्याने दिलेली आहे. रावणाचे हे फास आणि जुलुमाचे हे काच तोडल्याशिवाय पोटाला टाके घालणे आमचे थांबणार नाही ही त्यांची अनुभती ! या नंग्याच्या दुनियेत ' दोन देत दोन घेत ' वावरावयाचे हे सुर्व्यांनी मनाला बजावूनही शेवटी ' माणूस हा समर्थ सृजनात्मा' आहे या जाणिवेने नेहमीच खूप अनुभवायचे, पाहावयाचे आहे. इतर माणसांपेक्षा स्वतःचाही नीट शोध घ्यावयाचा शिल्लक आहे. — एक सत्य अनुभव, त्यापुढे हजार ग्रंथराज कोलमडून कोसळणारे ' या कवीने मानल्यामुळेच त्यांच्या कवितेला एक कमालीची गहिराई, अर्थपूर्णता लाभली आहे. ग्रंथ शेवटी या सत्याच्या अनुभूतीसाठीच वाचायचे असतात, पण त्यांचे बाटगे- पण कवीला जाणवते आहे. " संपलाच नाही भाकरीचा मार्ग ग्रंथातले स्वर्ग कशापायी. " नव्या अनुभवविश्वाला नव्या प्रतिमा शोधून मोठ्या सयुक्तिकपणे सुर्व्यांनी अभि- व्यक्ती साधलेली आहे. प्रतिमा आणि आशय यांचे नाते असे असावे की प्रतिमे आशयाला आणि आशयाने प्रतिमेला उजळून टाकावे. परस्परांना नवे अर्थ लाभावेत. त्यांच्या साहचर्यातून खुलावट वाढावी. त्यांच्या कवितांत अशा नव्या अर्थपूर्ण प्रतिमा बऱ्याच सापडतात.