पान:अभिव्यक्ती.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ / अभिव्यक्ती रंगविणारी, त्यासाठी आज आवश्यक असलेली लढाऊ वृत्ती चित्रित करणारी अशी ही सुर्व्यांची कविता आहे. व्यासंगपूर्ण संदर्भशोधाची निदान सकृत दर्शनी तरी वाटणारी धास्ती या कवीच्या बाबतीत वाटत नाही. मर्ढेकर, करंदीकर, चित्रे, डहाके, खोत यांच्या कवितां- तील प्रतिमांच्या उकलीवाबत कमालीचे दडपण ( tension) रसिक मनावर असते. कारण विविध परिमाणे ( multi dymentions ) आणि अनेक संदर्भसूचकता ( references ) घेऊनच ती कविता जन्माला आलेली आहे हे मी तरी गृहीत धरतो. याचा अर्थ सुर्व्यांची कविता मोठी सुबोध आणि एकदा वाचल्याबरोबर उलगड- णारी आहे किंवा तिला विविध परिमाणे व अनेक संदर्भाचे संसूचन नाही असे नव्हे तर ' नारायण सुर्वे हे कामगारजीवनाशी केवळ समरस नव्हे तर ते जीवन प्रत्यक्षात अनुभवणारे कवी आहेत. नारायण सुर्वे यांनी पुस्तकांच्या कपाटात आपली स्फूर्तिस्थाने शोधली नाहीत. सभोवारच्या परिसरात ते काही श्रद्धा जागत्या ठेवून जगत आहेत आणि त्यातूनच त्यांनी काव्याचा शोध घेतलेला आहे - " म्हणून कवी- प्रमाणेच रसिकांच्याही हृदयावर कोरली जाणारी ही अनुभवाभिव्यक्ती निश्चितच अस्वस्थ करून सोडणारी आहे. एका उत्कट, प्रामाणिक, सार्थ अनुभूतीला तेवढीच उत्स्फूर्त, समर्थ अभिव्यक्ती लाभल्याच्या जाणिवेने अक्षरशः दिपवून टाकते त्यांची कविता ! मराठीमध्ये मोजक्याच कविता लिहून ' श्रेष्ठ कवी ' असे अमाप यश मिळवि- णाऱ्या केशवसुत, तांबे, बालकवी, मर्ढेकर यांच्या मालिकेत मला आज तरी ' नारायण सुर्वे' यांचा समावेश करावासा वाटतो. कारण १९६२ च्या ' ऐसा गा मी ब्रह्म ! मधील ५० कवितांनंतर तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९६६ साली ' माझे विद्यापीठ' अवघ्या ४० कवितांनिशी प्रतिष्ठा पावले आणि आता सात वर्षांनंतर यांचा ' जाहिर- नामा' प्रकाशित झाला आहे. यापुढे विपुल काव्यलेखनाची ग्वाही नारायण सुर्वेकडून मिळाली असूनही हा विचार मनाला स्पर्शन जातो. " त्यांच्या ' ऐसा गा मी ब्रह्म ! ' आणि ' माझे विद्यापीठ' मधील कविता वाचल्या- नंतर महत्त्वाची जाणीव होते ती या कवीच्या ठिकाणी असलेल्या विलक्षण आत्म- विश्वासाची, प्रचंड निर्भयतेची ! ' माझे विद्यापीठ ' च्या प्रस्तावनेत ते लिहितात- ह्या संग्रहातील कविता सर्व काही बोलेल. तिला स्वतःचा अनुभव आहेच, भाषाही आहे. मग माझे पांगळे निमित्त कशाला खऱ्या कलावंताकडून याच निःसंदिग्ध भूमिकेची अपेक्षा असते. 'ऐसा गा मी ब्रह्म ! ' च्या आभारप्रदर्शनातही ते लिहितात- " जे जाणवले, काळजात सलले, तेच शब्दरूप घेऊन बाहेर पडले.. ... मी स्वस्थ बसेन, शरीर स्वस्थ बसेल; पण आत्मा स्वस्थ बसूच देईना. शब्द मला ढकलीत राहिले. मी ढकलला जाऊ लागलो. विद्यमान मराठी कवितेत आपण कुठे आहोत ? असाही १. कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या 'ऐसा गा मी ब्रह्म' च्या प्रस्तावनेतून