पान:अभिव्यक्ती.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

6 ' सावध , नारायण सुर्वे आठ नारायण सुर्वे यांच्या ' माझे विद्यापीठ ' मधील अनेक कविता अपूर्व जाणिवा एका नव्या भाषेत - त्या जाणिवांच्याच भाषेत व्यक्त करताना दिसतात. आशय आणि अभिव्यक्ती यांतील अद्वैताचे नाते सांगणाऱ्या त्यांच्या या संग्रहातील बऱ्याच कविता असल्यामुळे त्या. कटाक्षाने लक्षात राहातात. माझे विद्यापीठ, सत्य, उगीचच, नाळ, . स्वतःलाच रचित गेलो, असा कसा दगड झालो, मुंबई, हुन्नरी, बेअब्रू खूपच झाली, कठीण होत आहे, दगड, कर्जपुत्र, विश्वास ठेव, विझता विझता स्वतःला, माणूस, माझे शब्द, ऊठ, सावध अशा कितीतरी कविता रसिक वाचकाला झपाटून टाकणाऱ्या आहेत. सुर्व्यांच्या कवितेचे हे मुळी वैशिष्ट्यच म्हणावे लागेल की ती पुनःपुन्हा वाचल्या- खेरीज समाधान होऊच नये. नारायण सुर्वे यांच्यातील कलावंताचे निदान हे सुयश तरी निर्विवाद मानायला हरकत नसावी. मात्र कलावादाला थोतांड मानणारा हा एक अजब कलावंत आहे. ताकाला जाऊन गाडगं लपविण्याची या कवीला सवय नाही, त्यांची मते सुस्पष्ट आहेत. १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या ' ऐसा गा मी ब्रह्म ! ' मधील कवितांपेक्षा ' माझे विद्यापीठ' या त्यांच्या १९६६ साली प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील कवितेने आपल्या नेहमीच्या उंचावणाऱ्या अपेक्षांप्रमाणे फार मोठा पल्ला गाठला आहे, असे निदर्शनास येते. नव्या प्रागतिक, वस्तुनिष्ठ व बुद्धिवादी विचारसरणीला हक्काचे व्यासपीठ त्यांनी 'माझे विद्यापीठ' मध्ये मिळवून दिले. ज्या आशयाच्या अभिव्यक्तीची ओढ या कवीला होती ती पूर्ण झाली असे निश्चित म्हणता येईल. " 'आज माझ्या वेदनेला अर्थ नवा येत आहे." ही 'माझी वेदना' म्हणजे प्रत्यक्षा- नुभूतीतून टिपलेली अलक्षित कामगारांची असह्य व्यथा, जी मोठ्या भेद्रक शब्दांत ते आपल्या कवितेतून अमर करतात. न्याय्य समाजवादी समाजरचनेचे चित्र :