पान:अभिव्यक्ती.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० / अभिव्यक्ती जुन्या जगाने केलेल्या अन्यायाचे क्षालन नवे जग निर्माण करून होणारे असल्यामुळे या आशावादी कवीने हे नवे जग कल्पनेने निर्माण केले आहे. ते नवे जग ... मानवधर्माच्या स्थापनेसाठी झटणारे नवे जग ते नव आशांना हासविणारे असून 'पूस आता आसू आणि हास बरे; ' असे सांगणारे आहे. जुन्या प्रेरणा आत्मसात करणाऱ्या अनिलांनी नव्या जगाला हे आवाहन केले आहे. ' आज अंधारी रात' मध्ये मनाची विषण्ण अवस्था निसर्ग प्रतिमांच्या साहाय्याने व्यक्त होत असली तरी 'अंतरंगी त्यांतही पण ओळखीचा प्रकाश आहे. ' ही हृद्य आशावादी भावनाच व्यक्त होते. कवी अनिल महाकठीण आघाताने जीवनात घायाळ झाले.. ( मी अजून चालत तुझ्यावाचून वाट एकाकी - ) तथापि ते जीवन सम्मुखच राहिले, म्हणूनच येथे 'सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जागतेपणी पडतें ” ( जुई ) ' कोंबडा साद नसतानाही आरवतोच !' संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या अनिलात उत्कट वाढती जीवननिष्ठा असल्याचे या रूपकात्मक कवितेतून दिसते. भारतीय कल्पनेतील 'एकेका पंजात दोन दोन हत्ती धरून उड्डाण करणान्या गंड- भिरुंड" या प्रचंड पक्ष्याचे म्हणूनच वर्णन त्यांच्या कवितेत येत असावे. ' जागच्या जागीच राहून हृदयप्रीतीचा वर्षाव करून घेते.' हे कवी अनिल म्हणूनच व्यक्त करतात. 'काळी' या कवितेतील शेवटच्या दोन ओळींतील आशय मोठा लक्षणीय आहे. • " ' भारीच सोशिक हिची वहिवाट झडीवर झड घेते सामावून कोरडे गेले पंधरवाडे तरी साहते आंतल्या आंत ओलावून ! " ' भग्नमूर्तीचे पुनर्दर्शन' या कवितेतील पुढील काव्यपंक्तीतील विचार - ' झाले नाही जे मध्ये गेलेल्या सात वर्षांत .... होणार आहे का पुढे येणाऱ्या ! ' किंवा 'उद्या' मधील आजचा निराश मी' यासारख्या निराशाजनक विचाराला क्वचितच, त्यांच्या कवितेत स्थान मिळताना आढळते. तरी श्रीज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी नतमस्तक होऊन ते म्हणतात- " नसे संत कोणी भाविक ना भक्त असे जीवमात्र जीवनी आसक्त " याचा अर्थ अनिलांच्या मार्गात क्वचित निराशेचे खाचखळगे येत असले तरी 'चिरयौवनात ' वावरणारा हा कवी आशावादाचा मार्ग चोखाळणारा आहे, ' चिरयौवना ' त राहाणारा आहे.