पान:अभिव्यक्ती.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'चिरयौवना' त कवी अनिल / ३९. त्या जीर्ण जगाच्या चितेतूनच - उडणार आहे अमरपक्षी नव्या स्थितीच्या नव व्यवस्थेच्या नव आदेशाचा नवाकांक्षांचा घेत जगदंड स्वपक्षाखाली... असा तेजस्वी आशावाद त्यांनी 'निर्वासित चिनी मुलास' या कवितेत प्रभावीपणे व्यक्त केला आहे. कवी अनिल आशावादी आहेत म्हणूनच वैयक्तिक प्रेमभावनेला वैश्विक प्रेमभावनेचे स्वरूप प्राप्त होताना दिसते. " प्रीती तुझी माझी नाही निराळेपणाची जगातल्या सुखदुःखाची मिळालेपणाची. " व्यक्ती-व्यक्तींवर श्रद्धा असलेल्या मानवतेच्या उदयतत्त्वाचा ते मोठ्या हिरीरीने पुरस्कार करतात. " स्थापावयाचे अधिराज्य मानवाचे" ही सुस्पष्ट भूमिका त्यांच्या सुप्त ज्वालामुखीमध्ये आहे. फार काळ निराशा, विफलता, दु:ख, कष्ट माणूस सहन करीत नाही. आपल्या विकासाचा मार्ग त्याला शोधावाच लागतो. ज्यांना आपण दुर्लक्षितो - क्षुद्र समजून धिक्कार करतो त्यांच्या ठिकाणी फार मोठे सुप्त सामर्थ्य आहे हा साक्षात्कार म्हणूनच या कवीला होऊ शकला. " वरती सुंदर फुललेल्यांनो ध्यानांत ठेवा आहे खालती सुप्त ज्वालामुखी.. " ते 'बजावतात - सर्वत्र स्वार्थाची, दांभिकतेची, पराभूतवृत्तीची दर्शने पाहून त्यांचे मन हेलावते. ' सारेच दीप कसे मंदावले आता... ज्योती विझू विझं झाल्या ' 'सान्याच आघाड्यांवर सामसूम कशी झालेली आहे स्थितीत एक आशेचा तारा कवी मनात चकाकतोच. ते म्हणतात, शिणलेला आणि वैतागलेला मी वाळलेली पाने गोळा करताना मातीमध्ये हात मळवीत होतो. ' आहे का ह्या सुप्तमातीमध्ये असे सामर्थ्य स्पर्शानेच जागणारे चैतन्य ? " पण अशा सांगाती' सारख्या कवितेतही स्वावलंबनाचा आनंद, स्वत: वरील प्रगाढ विश्वास व्यक्त होतो. स्वतःमधील धमक इथे प्रत्ययाला येते. 'नाश नाश चहूंकडे ' अशी स्थिती असूनही 'अजुन मूर्ती आतली, नसे मुळीही भंगली', असे कवी आपल्या जीवनकक्षा विस्तारविणाऱ्या 'आशागीता' त म्हणतो.