पान:अभिव्यक्ती.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ / अभिव्यक्ती 66 असलात जरी आज वामन वाढ खुंटलेले, खुजटलेले, दबले, दाबले चान्ही बाजूंनी तरिहि धरा त्रिविक्रम रूप दाबा पायाखाली वळी - कांळाला... "" हा भग्नमूर्तीच्या निमित्ताने कवीने दिलेला संदेश तर चिरस्मरणीय आहे. म्हणून येथे 'अंत' ही ऐश्वर्यवंत होतो. 'आणीवाणी 'तूनही प्रेमाच्या बळावर निभावतो आणि जीवनाचा खेळ होऊनही 'वाल खेळण्यातून मन अजून निघता निघत नाही. प्रेम आणि जीवन' मधील पेरीना चमनपेक्षाही कठीण विरोधाला पचवून- अनिलांनी आपले जीवन फुलविले होते. १९२१-२२ ते १९२९ ही सात-आठ वर्षांपर्यंतची त्यांची प्रणयसाधना ही त्यांच्या आशावादाची द्योतक म्हणावी लागते. सोशिकतेचे प्रतीक मानावे लागते. 66 'जगतातच जीवन आहे, जीवनातच आहे आनंद. येथे जगातच जीवनानंद -" या ' प्रेम आणि जीवन' कवितेतील ओळीत उलट आशावाद व्यक्त झाला आहे. सर्व प्रकारच्या विफलतेला अव्हेरून त्यांना-- " 'शाहीर आहे मी तेजस्वी, गाणे गाणारा, प्रीतीच्या आशावादाचा 23 "1 हे सांगणे आवश्यकं वाटले. “ प्रतिकूल परिस्थितीतही जीवनातील आशावाद टिकविण्याचा बाणा हा अनिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा ' स्थायीभाव ' म्हणावा लागेल. या विधानाशी सहमत व्हावे लागते. म्हणूनच कवी शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी " एका आशावादी समाजवादी बौद्धिक धारेचे प्रणेते कवी अनिल असल्याचा केलेला उल्लेखही पटण्याजोगा आहे. " चिरयौवनमध्ये आशावादाचे हे जे पडसाद उमटलेले दिसतात त्याला प्रामुख्याने कवी अनिलांचे सामाजिक मन कारणीभूत आहे. मानवी जगाला भविष्यकालीन समृद्धीचे बीज पेरण्याचे आवाहन 'पेर्ते व्हा - कवितेत आहे. 66 उठा रे उठा रे सत्वर सत्वर, तत्पर तत्पर " पेरा पेरा नव बीजे पेरा " "1 अशी या नवनिर्मितीच्या आशावादाला द्रुतलय आहे. दुःखाचे कढ आतल्या आत गिळणाऱ्या व्याकुळ पृथ्वीसारख्या अनेकांना ' पेर्ते व्हा ' च्या निमित्ताने धीराचा स्फूर्तिदायी संदेश कवीने दिला आहे. तो आशावादी, उज्ज्वल निसंशय आहे. आपल्या भव्य दिव्य संस्कृतीची पुन्हा स्थापना व्हावी असे त्यांना आग्रहाने प्रतिपादन करावेसे वाटते.