पान:अभिव्यक्ती.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'चिरयौवना' त कवी अनिल / ३७ चिंतनाचाच स्पष्ट सूर उमटलेला दिसतो. त्यांच्या या चिंतनशील व्यक्तित्वानेच त्यांना जीवनाच्या प्रामाणिक प्रेरणा, खंबीर निष्ठा जपायला लावल्या आणि समाज- जीवनाकडे खेचून नेले. केवळ आशावादी नव्हे तर ह्या प्रवृत्तीचे प्रमुख प्रतिनिधी ठरविले. युगधर्माची ही चाहूल त्यांनी आत्मसात केली. पण कलेचा आणि जीवनाचा सखोल, बुद्धिनिष्ठ तरीही स्वतंत्रच विचार केला हे मोठे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कवी अनिल हे मुळात भावकवी आहेत. त्यांची 'गीत असले कोणास कळा- वयाचे ? तुझ्या · माझ्यासाठीच गावयाचे' अशी स्थिती आरंभी असली तरी नंतर मात्र — अवघ्या अभाग्याचे आसू उभे माझ्या डोळ्यांत ' अशी अथांग व्यापक स्थिती झाली. हा सुशीतल मंद अनुकूल सुखद संवेदना देणारा 'अनिल' मधूनच 'अनल' होत असल्याचे दिसते - मग मांत्र संस्कृतिहास, समाजातील विषमता यांचे चित्र रेखाटले जाते. त्याबरोबरच जीवनातील आशा-निराशेचे सर्वांगीण ( तळाशी जाऊन ) चिंतन ते करू लागतात. यामुळेच मानवी संस्कृतीच्या भूतभविष्य वर्त- मानाचा एक व्यापक आलेख त्यांच्या कवितेत अवतरतो. त्यातून त्यांच्या विचारांची परिपक्वताही व्यक्त झालेली दिसते. व्यापक सहृदय मानवतावाद प्रकट करीत असताना ' अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही' अशी त्यांची झुंझारवृत्ती प्रत्ययाला येते. “ विचारांना भावनेचे अंकुर फुटून त्यास कार्यप्रवण करणारे असे जीवनोपयोगी तत्त्वज्ञान काव्यातून परिणामकारक रीतीने सांगता व सुचविता येते. ” हे आपले तत्त्वज्ञान ते मोठ्या आवेशासह उत्साहाने कवितेतून धुंदपणाने मांडतात. अर्थात आपल्या भावस्पर्शी प्रतिभेच्या आधारानेच. " " अजून यौवनात मी जगांत जागत्या आशा जगावयास गावया पहावया उषा निशा इथे निसर्गचारुता इथे प्रयत्न मानवी उचंबळोनि वृत्ति ये उमेद घेऊनी नवी " जीवनरसाने ओथंबून निघालेल्या 'चिरयौवन' या मधुर धुंद कवितेत चिर- तरुण वृत्तीने जीवनाकडे पाहाण्याची, सौंदर्याचा - सर्जनाचा ध्यास असलेली कवीची दृष्टी व्यक्त झालेली आहे. भाविकतेबरोबरच वैचारिकतेचा सुंदर मेळ त्यांच्या काव्यात आढळतो. ' भग्नमूर्तीतील ' काळजाला घरे पाडणारी व्यथा नुसती त्यांनी टिपली नाही तर भौतिकतेला कमी लेखणाऱ्या व्यापक मानवधर्माला जपणाऱ्या तत्त्वज्ञानाचा धिक्कार ते करतात. जीवनात रस घेऊन संस्कृतिसंवर्धनाचे तत्त्वज्ञान जबरदस्त निष्ठेतून कवी अनिलांनी या कवितेत सांगितले आहे. ते अमर आशावादाचा, सामर्थ्याचा महामंत्र देतात.