पान:अभिव्यक्ती.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

“ चिरयौवना ' त कवी अनिल सात 3 अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारे कवी अनिल आजही मोठ्या उमेदीने रसिकांच्या मनाला चटका लावणारे काव्यलेखन करीत आहेत, ही गोष्ट कविवर्य अनिल हे आशावादी, युयुत्सुवृत्तीचे कवी आहेत हे स्पष्ट होण्यास पुरेशी आहे. अनिलांच्या 'चिरयौवन' या काव्यसंग्रहातील चिरयौवन, पेर्ते व्हा, भग्नमूर्ति, प्रेम • आणि जीवन, सुप्त ज्वालामुखी, सारेच दीप कसे मंदावले आता, उद्या, आशागीत, निर्वासित चिनी मुलास उशिराचा पाऊस, जुई, काळी यांसारख्या कितीतरी कवितांत आशावादाची वीजे आढळतात. जीवनाच्या व कलेच्या आस्वादात रुची असलेले हे मन पाहिले म्हणजे अनिलांची खरी वृत्ती आशावादी आहे असे म्हणावेसे वाटते. कवी अनिल आशावादी आहेत असे म्हणताना एक कल्पना डोकावून जाते की, एखादा कवी ( साहित्यिक ) हा 'आशावादी', 'निराशावादी', असे म्हणणे कितपत उचित आहे ? असे विशिष्ट भावनांचे ठरीव छाप त्या कवीवर मांडणे इष्ट नाही कारण कवी, वेळोवेळी टिपलेल्या विविध भावछटांना - विभिन्न अनुभवांना, कल्पना – शब्दांतून साकार करीत असतो. त्यातून त्यांच्या विभिन्न भावावस्था - मनोवस्था ( state of mind) साकार होत असतात. विशिष्ट क्षणी जी भावना प्रबळ असेल ( मग ती निराशेची वा आशावादाची असेल ) ती अभिव्यक्त होणार, शिवाय विशिष्ट भावना साकार करणाऱ्या कवीच्या कवितांच्या संख्येवरूनही त्या कवीवर आशावादी वा निराशावादी असा शिक्कामोर्तब करता येणार नाही. त्या कवीची मूलभूत प्रकृती कवितांचे धर्म लक्षात घेऊनच फारतर असा विचार मांडता येईल. अनिलांची कविता ही पहिल्यांदा कविता आहे. त्या कवितेत त्यांच्या आशा- वादी मनाचे रंग कधी अंधुक, तर कधी स्पष्टपणे मिसळलेले दिसतात. कलावंताची प्रतिभा आणि चिंतन यांतूनच त्याची कलाकृती खऱ्या अर्थाने रूप घेत असते. चिरयौवनमधील अनेक कवितांत आशावादी प्रतिभावंतांच्या