पान:अभिव्यक्ती.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

, केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकता / ३५ — बी ' कवींच्यासारखे भारदस्त आणि तर्कनिष्ठ भाषेत केशवसुत आपल्या काव्यविषयक कल्पनांचा- विचारांचा आढावा घेत नाहीत. त्यांच्या मानसिक प्रक्रिया व्यक्त करणाऱ्या या कविता अनन्यसाधारण ठरतात. मराठीत तरी त्याला तोड नाही, असे म्हटल्यास वावगे वाटू नये. तात्पर्य, केशवसुतांच्या कवितेत अवतरलेली वैचारिकता आगन्तुक नाही. ती श्रेष्ठ दर्जाची वैचारिक कविता आहे. भावानुभव आणि विचारानुभव या दोन अनुभवघटकांपैकी दुसऱ्या प्रकारच्या अनुभवांना साकार करणारी ती कविता आहे. म्हणूनच कलादृष्ट्याही ती सरस ठरते. कलात्मक पातळी अबाधित राखूनच केशव- सुतांची वैचारिकता (अनुभवभाग बनून ) आलेली आहे. ' musical thought ' ती होते. केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकतेचे हेच खरे वैशिष्ट्य आहे.