पान:अभिव्यक्ती.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ / अभिव्यक्ती नेमकी हीच केशवसुतांची प्रवृत्ती - भूमिका - कलाविघातक ठरली. समाजातील विषमतेचा तीव्र निषेध मांडणारे ते सुधारणावादी विचार ठरतात. त्यांनी फुंकण्या- साठी 'तुतारी' च का घेतली ? कारण हेच की तिच्या तालावर रणगीत गाता येतं. होते. केशवसुतांच्या ह्यासारख्या कवितांत सूचकता कमी होते, सूक्ष्मतेचा अभाव जाणवतो. आशयाऐवजी विषय आणि तोही अभिधारूपातच प्रगट होतो. ' अन्त्यजाचा प्रश्न ' अथवा ' मजूरावर उपासमारीची वेळ' या कविताही गद्याच्याच पातळीवर गेल्याचे दिसून येते. या गद्यप्रायता असलेल्या केशवसुतांच्या कविता ' प्रेयस् ' वाटल्या तरी नक्कीच त्या — श्रेयस् ' नाहीत. आगरकर, टिळकांच्याच विचारांचा साक्षात्कार त्यांच्या या स्फूर्तिगानातून होतो. या कवितांना कलात्मक पातळी न लाभता पातळी लाभते ती वक्तृत्वाचीच ! इथे गद्य अनुभूती गद्यरूपातच अभिव्यक्त होताना दिसते. यापेक्षा मराठी वैचारिक कवितेच्या एका वेगळ्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाक- णारी कविता केशवसुतांनी लिहिली आहे. त्यांची काव्यविषयक स्वतःच्या जाणिवांना मूर्त करणारी विशेष लक्षणीय ठरते ती कविता ! केशवसुतांच्या अनुभूतीचे एक महत्त्व- पूर्ण अंग त्यात आढळते. साहित्याची अथवा कवितेची चर्चा कवितेतून ते करीत नाहीत. काव्य-शास्त्र त्यांना मांडावयाचे नव्हते. ('बी' कवींच्यासारखी ती कविता नाही. ) या कवितांची जातच निराळी आहे. तो काळ असा होता की, त्या काळात काव्य हा वाङ्मयप्रकार सामान्य दर्जाचा मानला जाई. महत्त्व दिले जात होते ते गद्याला, निबंधालाच ! तिथे खरोखरीच कवींची आणि रसिकांचीच उणीव भासत होती. अशा वेळी केशवसुतांनी कवितेची मूल्ये, कवितेकडे पाहाण्याची त्यांची खास दृष्टी, काव्यानुभूती कवितेतूनच मांडली. या वाङ्मयप्रकाराची वेगळीक आणि ओळख पटविण्याचाच त्यांचा हा प्रयत्न होता असे म्हणता येईल. अर्थात यातून त्यांना नुसते विचार सांगावे एवढेच अभिप्रेत नव्हते तर ती त्यांची स्वानुभूती होती. म्हणूनच ते - " अशी असावी कविता, फिरून तशी नसावी कविता, म्हणून सांगावया कोण तुम्ही कवीला आहांत मोठे ? पुसतों तुम्हाला' (कविता आणि कवि ) असे म्हणतात. 'कवीस सोडा कविते बरोबरी ' हेच त्यांच्या दृष्टीने खरे स्वातंत्र्य आहे. केशवसुतांचा खऱ्या कवीचा पिंड लक्षात घेता हे ' नवकाव्य समर्थन' नसून ही भूमिका नवकाव्य निर्मात्याची होती असे निश्चितपणे त्यांच्या काव्यविषयक कवि- तेच्या स्वरूपावरून म्हणता येईल. त्यातूनच त्यांचे हे कायचिंतन स्फुरलेले आहे. त्यांच्या अनुभूतीचाच तो अपरिहार्य भाग होता. एका महान कलावंताची ती प्रामाणिक तळमळ होती.