पान:अभिव्यक्ती.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकता / ३३ 'झपूर्झा' ह्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कवितेतही ( चितनिकेत ) एका गूढ जाणिवेच्या स्पंदनाला त्यांनी शब्दबद्ध केलेले आहे. सुखदुःख निरपेक्ष द्वंद्वातीत अवस्था चित्रित करण्याचा 'झपूर्झा' ही कविता केशवसुतांचा एक महान यशस्वी प्रयोग आहे असे म्हणावे लागते. 'क्षणात नाहीसे होणारे दिव्यभास' या कवितेत भग्न तन्मयतेचे सुंदर चित्र केशवसुतांनी चित्रित केले आहे. वैचारिकतेची विविध रूपे केशवसुतांच्या गाजणाऱ्या साऱ्याच चिंतनिका; त्यांतील चिंतनाचा, विचारांचा आविष्कार भावनामय आहे आणि म्हणून त्या विचारांना विचारानुभव ' त्व' प्राप्त होते. अशा प्रकारच्या कविता मोजक्या असल्या तरी कवी म्हणून केशवसुतांचे मोठेपण सिद्ध करण्यास पुरेशा होतात. त्यांच्या या कवितांना अनेक परिमाणे लाभतात. म्हणून त्याचे भिन्न भिन्न अर्थ लावले गेल्याचे दिसून येते. त्यांत कुठेही विचारांचे प्रतिपादन interpretation नाही, तर सतत चिंतनाने अनुभवले तेच साकार झालेले दिसते. इंग्रजी अथवा अन्य भाषेतील काव्यवाचनातून जन्मलेल्या आत्मपरतेला केशव- सुतांनी आत्मसात केले. खास मराठी परंपरेशी जुळविले. कलावंताच्या अनुभवाचे संघटन करणारे तत्त्व त्या विशिष्ट काळाच्या आणि विशिष्ट व्यक्तीच्या विशेषातून निर्माण होत असते. अर्थातच केशवसुतही या नियमाला अपवाद नाहीत. केशवसुतांनी सामाजिक क्रांतीच्या व राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून उत्स्फूर्तपणे लिहिलेल्याही काही कविता आहेत. मात्र त्यांच्या या प्रकारच्या कविता म्हणजे तत्का- लीन सामाजिक व वैचारिक प्रबोधनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. या संदर्भातच ' केशवसुतांनी मराठी कवितेला सामाजिक आशयाची अपरिहार्य बैठक मिळवून दिली.' हे विधान केले जाते. यात 'तुतारी', 'नवा शिपाई', 'स्फूर्ति' इत्यादी कवितांचा समावेश होतो. पण केशवसुतांचे खरे सामर्थ्य तुतारी वा तत्सम अन्य कवितांत नाही. त्यांची ही सामाजिक म्हटली जाणारी कविता भिन्न प्रकारची ठरते. केवळ सामाजिक विषयापुरतीच मर्यादित स्वरूपाची ती राहाते. याचे कारण तत्कालीन सामाजिक जीवनात आढळणाऱ्या रूढी, जुलूम, अन्याय इत्यादी विषयांवर ती स्थिर आहे. समाजदोषांवर हल्ला करण्याचा प्रयत्न इथे अगदी स्पष्टपणे दिसून येतो. उदा. : - 'ब्राह्मण नाही, हिन्दू नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडिती प्रदेश साकल्याचा ' देव-दानवां नरें निर्मिले हे मत लोका कवळू द्या. 'बंडाचा तो झेंडा उभवुनि धामधूम जिकडे तिकडे उडवुन देऊनि जुलमाचे या करू पहा तुकडे तुकडे ' अ... ३