पान:अभिव्यक्ती.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ / अभिव्यक्ती 'अस्मदीय हृदयी ठरलें । की जग हे दुःखे भरले ।' (भृंग ) काळोखाच्या जगामधे या । मृत आशांच्या चिता वरुनिया ' वाटे नाटक शोकसंकुल असे जीवित्व हे याजला' (नैऋत्येकडला वारा ) 'आमुचा पेला दुःखाचा डोळे मिटुनी प्यायाचा' ( पद्यपंक्ति ) मीहि कशाला येथे रहावे काय असे ज्या मी चिकटावे ' ( वातचक्र) " तिमिरी आम्ही नित्य रखडणें, विवंचनांतचि जिणे रखडणे' (फुलपाखरास ) दुःखद-व्यथा-वेदनांना साकार करणा-या चिंतन- विचारगर्भ जाणिवा विविध पातळ्यांवरून कलापूर्ण रूपानेच प्रकट झाल्या आहेत. 'सुनीत' हा काव्यप्रकार याच चिंतनपरंपरेतून आलेला आहे. केशवसुतांनी 'सुनीत ' लिहिले ही गोष्टही मोठी सूचक म्हणावी लागेल. केशवसुतांच्या प्रतिभेला अनुकूल म्हणूनच 'सुनीत' आलेले आहे. त्यांची मनोवृत्ती चिंतनगर्भ व अंत:करण विलक्षण संवेदनाक्षम असल्याचे दिसून येते. त्यांच्या या चिंतनाची आविष्कृती काव्य- मय असल्यामुळेच केशवसुतांची कवीची भूमिका अबाधित राहिली आणि कविताही मराठीतील श्रेष्ठ दर्जाची वैचारिक कविता ठरू शकली. या मराठीतील चिंतक कवीच्या चिंतनाचे विषय अव्यक्त, अरूप अशा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घडविणारे आहेत. स्वानुभूती, आत्मप्रचीती यामागे असल्यामुळे रसरशीत, अस्सल व जिवंत जीवना- नुभवाला केशवसुत यशस्वीपणे साकार करू शकले. म्हणूनच मराठी साहित्यात त्यांच्या चिंतनिका मौलिक ठरतात. तो मज गमलें विभूति माझी स्फुरत पसरली विश्वामाजी; दिक्कालासहि अतीत झालों उगमीं विलयीं अनंत उरलों; विसरुन गेलों अखिलां भेदा (सतारीचे बोल) येथे केशवसुत साकार करतात विभूतिमत्वाच्या उत्कट जाणिवेला आणि आत्मतत्त्वाच्या प्रतीतीला ! त्याचा नुसता ओझरता स्पर्शही केशवसुतांना पुरेसा होतो. लगेच ते अंतःकरणातील भेद विसरतात आणि अद्वैत पटते. ह्याच ठिकाणी निर्द्वद्वावस्थेला साकार करणारा श्रेष्ठ - कलात्मक विचारानुभव साक्षात होतो.