पान:अभिव्यक्ती.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकता / ३१


 अखिल मानवजातीचा - समाजाचा - त्यांच्या उद्धाराचा एका ध्येयनिष्ठ स्वरूपात केशवसुतांनी विचार केला होता. एकीकडे समाजविषयक जाणिवांचा तर दुसरीकडे romanticism चा परिणाम केशवसुतांच्या वृत्तीवर झाला होता. या वृत्तींनी घडविलेले कविमन स्वाभाविकपणे मानवीजीवनविषयक चिंतनात गढून गेल्याचे • आढळले. एवढेच नव्हे तर गूढ अनुभूतींचा स्वीकार करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा 'महत्त्वाचा धर्म ठरला. यातूनच त्यांनी चिंतनिकांना जन्म दिला आहे. आशावादी आणि ‘निराशावादी या दोन्हीही प्रकारच्या प्रवृत्तींमधून केशवसुतांचे गूढगुंजन जन्माला आले. तथापि या भिन्न प्रवृत्तीदेखील केशवसुतांच्या एकसंध व्यक्तिमत्त्वाचेच दर्शन घड- `वितात. त्यांची अनुभव घेण्याची विशिष्ट पद्धती, तिच्यात झालेला बदल हीच केशव- सुतांच्या कवितेची क्रांती. कवितेतून साकार झालेल्या त्यांच्या जीवनविषयक जाणिवा या खास त्यांच्या बनल्या होत्या. जीवनाला संघटित स्वरूपात साकार करणारी त्यांची काव्यानुभूती आहे.
केशवसुतांच्या चिंतनाचे स्वरूप
 'झपूर्झा', 'म्हातारी', 'आमुचा पेला दुःखाचा', 'कोणीकडून कोणीकडे ?' ' हरपले श्रेय', ' सतारीचे बोल ', ' कुठे जाशी तू ? ' या कवितांचा उल्लेख वरील - संदर्भात करता येईल.
 मानवी जीवनविषयक मूलभूत प्रश्नांचा विचार केशवसुत या कवितातून करीत असल्याचे दिसून येते. जीवनातील विविधतेचा, त्यातील चिरंतन 'त्वा 'चा, जन्म- मरणापलीकडील मनुष्याच्या अवस्थेचा शोध केशवसुतांची कविता घेत असल्याचे - दिसते. केशवसुतांच्या संमिश्रभावांना साकार करणाऱ्या व्यक्तिमत्त्वात हे सारे -सामावले जाऊ शकते.

 जीवित मिथ्या नसून ते झगडण्यासाठीच आहे हे ह्यांनी पुरते ओळखले होते.
'

'नाही स्वप्न न भास बुडबुडा : जीवित साचे असे

'

 या जीवनात 'तम अल्प द्युति बहु' असे त्यांना वाटे. मात्र त्यांची वृत्ती सतत -विकासोन्मुख असल्याचे लक्षात येते; त्यामुळेच जीवनविषयक कारुण्यपूर्ण, अगतिक अशी भावनिक प्रक्रिया त्यांच्या कवितेतून जाणवते.

'झिजवित नित्य जिणे तयांना आहे का मरणे '


असेही ते म्हणतात. मानवी प्रवृत्तीच्या झगडण्यानेच ती अमर होते. 'काट्या- 'वाचून गुलाब नाही ' या सान्या महत्त्वाच्या जाणिवा त्यांच्या व्यक्तित्वाला अनुकूल आहेत. जीवनाकडे वा जगाकडे पाहाण्याची हीच दृष्टी त्यांच्या अनेक कवितांतून व्यक्त होते.