पान:अभिव्यक्ती.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२ / अभिव्यक्ती


इब्सेन ह्यांची खरी अंतःसामर्थ्यानिशी ओळख पटली नाही हेच खरे! कोल्हटकरांचा हेतूच रंजन असल्यामुळे गांभीर्य निर्माण होऊ शकले नाही आणि त्यामुळेच सामाजिकताही येऊ शकली नाही.
 कोल्हटकरांनी आपल्या नाटकांतून समाजसुधारणाविषयक विचार खेळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला; पण कोल्हटकरांना स्वतंत्रपणे सामाजिक समस्या जाणवल्या; वस्तुतः त्या नाटयानुभवाच्या संदर्भात जाणवायला हव्या होत्या.